महाराष्ट्र ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

9 फेब्रुवारी पुणेमहाराष्ट्र ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार बिनविरोध निवडून आले आहेत.पुण्यात ही निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत सगळ्यांच लक्ष होतं ते सेक्रेटरीच्या निवडणुकीकडे. कुस्तीसंघटक बाळासाहेब लांडगे यांनी प्रतिस्पर्धी प्रताप जाधव यांचा 28 विरुध्द 1 अशा मतानं पराभव केला.प्रल्हाद सावंत आणि जय कवळी संयुक्त सचिवम्हणून निवडून आलेत.तर चंद्रकांत शिरोळे खजिनदार असतील.संघटनेच्या उपाध्यक्षपदी सतिश प्रधान आणि अशोक पंडीत यांची निवड करण्यात आली.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकणा-या सुशील कुमार आणि विजेंदर यांना पद्मश्री पुरस्कार नाकारला हे योग्यच होतं. आधी गोल्ड मेडल मिळवा आणि नंतर पुरस्काराची मागणी करा असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2009 07:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2009 07:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close