समलैंगिक असल्याचा आरोप करत तरुणीला बेदम मारहाण, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

समलैंगिक असल्याचा आरोप करत तरुणीला बेदम मारहाण, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

तुम्ही या व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता की, समलैंगिक असल्यामुळे कशा पद्धतीने तरुणीची मारहाण करण्यात येत आहे.

  • Share this:

मेरठ (उत्तर प्रदेश) 29 सप्टेंबर : तरुणांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका समलैंगिक तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये समलैंगित तरुणाला खांबाला बांधण्यात आलं आणि त्यानंतर तिला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचं दिसतं आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तुम्ही या व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता की, समलैंगिक असल्यामुळे कशा पद्धतीने तरुणीची मारहाण करण्यात येत आहे. तरुणीवर समलैंगिक असल्याचा आरोप करत तिला खांबाला बांधलं आणि त्यानंतर तिची बेदम मारहाण करण्यात आली आहे. मोठ्या जमावाने तरुणीची मारहाण करण्यात आली. बरं इतकंच नाही तर तिचा चेहऱ्याला काळा रंग लावण्याचा प्रयत्नही जमावाकडून करण्यात आला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मेरठच्या लिसा़डी गेट क्षेत्र परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. 4 दिवसापासून हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात पीडित तरुणीच्या आईने 3 जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून आरोपीची धरपकड सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांआधी मध्य प्रदेशमधून एका सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप स्कँडलनं सध्या मध्य प्रदेशसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नेते आणि अधिकाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या या गँगनं त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचं आता समोर आलं आहे.

मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेट उघडकीस आल्यानं देशभरातील अनेक बडे अधिकारी आणि नेत्यांची अक्षरश: झोप उडाली. कारण, या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येताहेत. शिवाय पोलिसांनी आरोपींकडून व्हीआयपींच्या 4 हजार फाईल्स ताब्यात घेतल्यात. या फाईल सेक्स स्कँडल संबंधित आहेत. या फाईल्समध्ये बड्या अधिकाऱ्यांचे सेक्स चॅट, न्यूड व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचा समावेश आहे. या फाईल्स पोलिसांच्या हाती आल्यानं अनेक नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची झोप उडालीय.

इतर बातम्या - पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खरं प्रेम संपवलं, मधे पडला म्हणून मुलावर वार

कसे अडकले अधिकारी, नेते?

- अधिकाऱ्यांना, नेत्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं

- सेक्स व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करायचं

- ब्लॅकमेल करत कंत्राटं, पैसे मिळवायचे

- गँगनं आयएएस अधिकाऱ्यांची बनवली 'टार्गेट लिस्ट'

- अधिकाऱ्यांची नावं कोड वर्डच्या माध्यमातून नोंदवली

- अधिकाऱ्यांची टार्गेट लिस्ट तपास अधिकाऱ्यांच्या हाती

इतर बातम्या - 'मृत्यूचा मेन्यू' चायनीज दुकानावर झाला वाद, तरुणाला डोक्यात रॉड घालून केलं ठार!

या गँगनं आतापर्यंत चार राज्यातील महत्त्वाचे नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर आणि मोठ्या व्यापाऱ्यांना आपली शिकार बनवलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मत्स्यपालन, कृषी, उद्योग, वन, जलसंधारण, जनसंपर्क सहित इतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेल्या १३ आयएएस अधिकाऱ्यांची नावं यात आहेत.

इंदूरमधल्या नगरपालिकेच्या एका अभियंत्यानं केलेल्या तक्रारीनंतर देशातील सर्वात मोठ्या हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश झाला. यात आत्तापर्यंत पाच महिलांना भोपाळ आणि इंदूरमधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोज नवनवे खुलासे होवू लागल्यानं अनेक नेते आणि अधिकाऱ्यांची झोप उडाली.

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

Published by: Renuka Dhaybar
First published: September 29, 2019, 4:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading