यंग ब्रिगेडचा सचिनला 'मास्टर'सलाम

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2013 05:54 PM IST

यंग ब्रिगेडचा सचिनला 'मास्टर'सलाम

15 नोव्हेंबर : गेली दोन दशकं क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ग्रँड निरोप देण्यासाठी यंग ब्रिगेडने धडाकेबाज इनिंग खेळून सलामी दिलीय. सचिनची अखेरची 200 वी कसोटी यादगार रहावी अशीच खेळी आज यंग ब्रिगेडने केली.

sachin5656

सचिनने आपल्या अखेरच्या कसोटीमध्ये 74 धावा करून समस्त क्रिकेट विश्वाचा निरोप घेतला. मात्र ही मॅच जिंकून सचिनला विजयी भेट देण्याचा 'प्लॅन' यंग ब्रिगेडने आखलाय. भारताने दुसर्‍या दिवशी रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी खेळीवर 495 धावांचा डोंगर उभा केला.

भारताने या मॅचमध्ये 313 धावांची भक्कम आघाडी घेतली. याला उत्तर देतना मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची दुसर्‍या इनिंगमध्येही खराब सुरुवात झाली. आर अश्विन आणि प्रग्यान ओझाच्या स्पीन बॉलिंगसमोर अवघ्या 43 रन्सवर विंडीजनं 3 विकेट गमावल्या. ओपनिंगला आलेल्या पॉवेलला आर अश्विननं आऊट केलं. तर प्रग्यान ओझानं टीनो बेस्टची विकेट घेतली. तर डॅरेन ब्राव्होही 11 रन्सवर आऊट झाला. विंडीजची टीम आणखी 278 रन्सनं पिछाडीवर आहे.

Loading...

रो'हिट' सेंच्युरी

भारतीय टीमचा तडाखेबाज फलंदाज आणि मुंबईकर रोहित शर्माने आज आणखी एक हिट इनिंग दिली. टेस्ट क्रिकेटच्या कारकिर्दीत प्रदार्पण करणार्‍या रोहितने सलग दुसरी सेंच्युरी झळकावली आहे. वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडीज विरुद्ध सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटीत रोहितने दुसर्‍या दिवशी 127 बॉलमध्ये तीन षटकार आणि 11 चौकार लावत सेंच्युरी झळकावली आहे. रोहितने पाचव्या विकेटसाठी मैदानावर उतरून खणखणीत 111 धावा ठोकल्या आहेत. या अगोदर सचिन सोबत मैदानावर तळ ठोकून असलेल्या चेतेश्वर पुजाराने 113 रन्स करुन सेंचुरी झळकावली. रोहित आणि चेतेश्वरच्या सेंचुरीच्या बळावर भारताने 495 धावावर सर्वबाद पहिली इनिंग घोषित केली.

थँक्यू सचिन

मात्र त्याअगोदर ज्या शतकाची चाहते वाट पाहत होते त्या शतकाने हुलकावणी दिली. मुंबई टेस्टमध्ये वानखेडे स्टेडिअमवर सचिन तेंडुलरकरची ऐतिहासिक खेळी आज संपुष्टात आली. टेस्ट कारकिर्दीतली 200वी आणि अखेरची टेस्ट मॅच खेळणारा सचिन तेंडुलकर 74 रन्सवर आऊट झाला. पहिल्या दिवसअखेर 38 रन्सवर नॉटआऊट असलेल्या सचिनच्या बॅटिंगवर आज करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष होतं. सामान्य क्रिकेटप्रेमींपासून बॉलिवूड, ते राजकीय दिग्गजांनीही वानखेडे स्टेडिअमवर हजेरी लावली होती. सचिन बॅटिंगला मैदानात आल्यावर क्रिकेटप्रेमींना सचिनच्या नावाचा जयघोष केला.

सचिनही संयमी बॅटिंग करत आपली हाफसेंच्युरी पूर्ण केली. टेस्ट क्रिकेटमधली ही त्याची 68वी सेंच्युरी ठरली. पण 74 रन्सवर असताना देवनारायणच्या बॉलिंगवर सचिन आऊट झाला आणि संपूर्ण स्टेडिअममध्ये शांतता पसरली.तब्बल दोन दशकं क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सचिन अखेरच्या मॅचमध्ये दमदार खेळी करत आऊट झाला. त्यामुळे चाहत्यांना दुख झालं. पण इतकी वर्ष ज्याने क्रिकेटसाठी भरभरून दिलं, आपलं आयुष्य क्रिकेटसाठी वाहुन घेतलं त्या सचिनला आज थँक्यू म्हणण्याची वेळ होती. थँक्यू सचिन....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2013 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...