नवी मुंबईत घरांच्या किंमतींचेही 'टेक ऑफ'

नवी मुंबईत घरांच्या किंमतींचेही 'टेक ऑफ'

  • Share this:

navi mumbai home rateशैलेश तवटे, नवी मुंबई

15 नोव्हेंबर : नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता तिथल्या घराच्या किंमतीही वधारल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न मात्र आता स्वप्नच राहणार आहे.

नवी मुंबईच्या विमानतळाची बातमी येताच अनेकांना निश्चितच आनंद झाला असेल. पण याच विमानतळाचा परिणाम नवी मुंबई आणि परिसरातल्या घराच्या किमतीवर होताना दिसतोय. मुंबईच्या तुलनेत कितीतरी पटीनं नवीमुंबईचा झपाट्यानं विकास होतोय. याचा परिणामही नवी मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटवरही झालाय. यामुळे घरांच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढतील, असं बिल्डरांचं म्हणणं आहे.

नवी मुंबई परिसरात नव्यानं विकसित होणार्‍या उलवे, पनवेल, खारघर, कामोठे आणि तळोजा या शहरात घरांच्या किमती वाढणार आहेत. याभागात सुमारे दोन हजाराहून अधिक इमारतींचं बांधकाम सुरु आहे. भाव वाढल्यानं त्याचा फटका थेट सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईतील विकासकांची चांदी होणार पण काय सामान्यांच्या घाराचं स्वप्न पूर्ण होणार की फक्त स्वप्नंच राहणार आहे. नव्या विमानतळामुळे वाढणार्‍या घरांच्या किंमतीवर सरकारनं अंकुश ठेवावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

 

First published: November 15, 2013, 9:13 AM IST

ताज्या बातम्या