सचिन आऊट झाला

  • Share this:

sachin fifty15 नोव्हेंबर : मुंबईतल्या वानखेडे मैदानावर जमलेले चाहते आज एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. गेली 24 वर्ष अविरत खेळणारा मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर आज धडाकेबाज बॅटिंग करत 74 रन्सवर आऊट झालाय. ही ऐतिहासिक विकेट देवनारायणला मिळाली. सचिन आऊट झाला हे अनपेक्षित होतं, अख्ख स्टेडियम स्तब्ध झालं, स्टेडियमवर एकच स्मशान शांतता पसरली.

सचिन जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतत होता तेव्हा सचिन आऊट झाल्याच्या धक्क्यातून सावरून क्रिकेटप्रेमी, दिग्गजांनी उभं राहुन सचिनला मानवंदना दिली. पहिल्या दिवशी सचिनने 38 धावांवर नाऊट राहिला. त्यामुळे सचिनने शतक करावं अशी अपेक्षा सर्व चाहत्यांनी केली.आज दुसर्‍या दिवशीची सुरूवात सचिन आणि पुजाराने धडाकेबाज केली. सचिनने स्ट्रेट ड्राईव्हला चौकार लगावत आपली 68 वावी हाफसेंच्युरी पूर्ण केली.

अर्धशतकानंतर सचिनने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरूवात केली. मात्र देवनारायणच्या बॉलवर फर्स्ट स्लीपमध्ये सॅमीच्या हातात झेल देऊन सचिन आऊट झाला. आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीतील अखेरच्या 200 व्या कसोटी मॅचमध्ये सचिन 74 धावांवर आऊट झाला. तब्बल दोन दशकं क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सचिन अखेरच्या मॅचमध्ये दमदार खेळी करत आऊट झाला. त्यामुळे चाहत्यांना दुख झालं. पण इतकी वर्ष ज्याने क्रिकेटसाठी भरभरून दिलं, आपलं आयुष्य क्रिकेटसाठी वाहुन घेतलं त्या सचिनला आज थँक्यु म्हणण्याची वेळ होती. थँक्यु सचिन....

 

रो’हिट’ सेंच्युरी, भारताची भक्कम आघाडी

 

भारतीय टीमचा तडाखेबाज फलंदाज आणि मुंबईकर रोहित शर्माने आज आणखी एक हिट इनिंग दिली. टेस्ट क्रिकेटच्या कारकिर्दीत प्रदार्पण करणार्‍या रोहितने सलग दुसरी सेंच्युरी झळकावली आहे. वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडीज विरुद्ध सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटीत रोहितने दुसर्‍या दिवशी 127 बॉलमध्ये तीन षटकार आणि 11 चौकार लावत सेंच्युरी झळकावली आहे. रोहितने पाचव्या विकेटसाठी मैदानावर उतरून खणखणीत 111 धावा ठोकल्या आहे.

 

या अगोदर सचिन सोबत मैदानावर तळ ठोकून असलेल्या चेतेश्वर पुजाराने 113 रन्स करुन सेंचुरी झळकावली. रोहित आणि चेतेश्वरच्या सेंचुरीच्या बळावर भारताने 495 धावावर सर्वबाद पहिली इनिंग घोषित केली. या इनिंगसह भारताने तब्बल 313 धावांची भक्कम आघाडी घेतली. मात्र त्याअगोदर ज्या शतकाची चाहते वाट पाहत होते त्या शतकाने हुलकावणी दिली.

 

First published: November 15, 2013, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading