सचिनची उद्या अखेरची कसोटी

सचिनची उद्या अखेरची कसोटी

  • Share this:

sachin fifty13 नोव्हेंबर : 1989 मध्ये 16 वर्षांच्या सचिन तेंडुलकरनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केलीआणि आता तब्बल 24 वर्षांनी सचिन आपल्या क्रिकेट कारकिर्दीतली अखरेची टेस्ट मॅच खेळणारय.. सचिनला ग्रँड निरोप देण्यासाठी करोडो भारतीय क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानची दुसरी टेस्ट मॅच उद्यापासून खेळवली जाणार आहे. पण सर्वांचं लक्ष असणार आहे ते आपल्या लाडक्या सचिनच्या कामगिरीवर.

24 बॉल, 2 फोर आणि अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका, 199 वी टेस्ट मॅच खेळणार्‍या सचिन तेंेडुलकरला ईडन गार्डनवर केवळ एकच इनिंग खेळता आली. या मॅचमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला. पण स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या हजारो क्रिकेटप्रेमींना आपल्या लाडक्या सचिनची मोठी खेळी पाहता आली नाही.

पण आता हे स्वप्न वानखेडे स्टेडियमवर पूर्ण होणार का ? सचिन तेंडुलकर आपली 200वी आणि टेस्ट कारकिर्दीतली शेवटची टेस्ट मॅच खेळण्यासाठी गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर उतरेल. तेव्हा अवघ्या क्रिकेट जगताच लक्ष त्याच्याकडे असेल. पुढची 5 दिवस सचिनचा उत्साह वाढवण्यासाठी संपूर्ण स्टेडियम गर्दीने फुलून जाणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुनही इंडियन टीमसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला आणि सचिनच्या शेवटच्या मॅचचा साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण तेंडुलकर कुटुंब स्टेडियममध्ये हजर असणार आहेत. सचिनची आई पहिल्यांदाच आपल्या मुलाचा खेळ स्टेडियममध्ये बसून बघणार आहे. स्थानिक संस्थांचे कर्मचारीही सचिनच्या मॅचच्या तयारीत तसूभरीही कमतरता राहू नये, यासाठी आठवड्याची सुट्टी सोडून ओव्हर टाइम करत आहेत.

सचिनची 200 वी मॅच असल्यानं सगळ्यांचं लक्ष सचिनवर तर असेल. पण, या मॅचचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल याची ही दीडशेवी टेस्ट असणार आहे. सचिनएवढा त्याचा गवगवा होणार नाही. अर्थात चंद्रपॉलला याची खंत नाही. पुढचे पाच दिवस आता देशभर असेल तो फक्त सचिनोत्सव...

First published: November 13, 2013, 9:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading