सर्वसामान्य चाहत्यांच्या नशिबी सचिनची मॅच टीव्हीवरच !

सर्वसामान्य चाहत्यांच्या नशिबी सचिनची मॅच टीव्हीवरच !

  • Share this:

sachin last match tickt12 नोव्हेंबर : क्रिकेट ज्यांचा धर्म..सचिन त्यांचा देव...सचिन तेंडुलकर अनेक क्रिकेट चाहत्यांच्या गळत्याला ताईत त्यामुळे आपल्या लाडक्या सचिनची अखेरची कसोटी पाहण्याची संधी कोणताही चाहता सोडणार नाही. पण वानखेडेवर अखेरच्या मॅचचं तिकिटं घेण्यासाठी गेलेल्या चाहत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

वानखेडेवर तिकिट विक्रीचा गोंधळ आज दुसर्‍या दिवशीही सुरूच आहे. सामान्य क्रिकेटप्रेमींना तिकिटं मिळत नसल्यानं प्रचंड नाराजी आहे. तिकिटांची ऑनलाईन विक्री करणारी कॅझुंगा डॉट कॉम ही साईटही सोमवारी क्रॅश झाली होती, काही तासानंतर सुरु झालेल्या साईटवरुन काही अवधीत सर्व तिकिटांची विक्रीही झाली. 32 हजार आसनक्षमता असलेल्या वानखेडे स्टेडिअमवर केवळ 4 हजार तिकिटं सामान्यांच्या वाट्याला आलीत.

त्यामुळे सामान्य क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली. त्यातही या तिकिटांची ऑनलाईन विक्री संपल्यामुळे क्रिकेटप्रेमी आणखीनच संतापले. राज्यभरातून आलेल्या क्रिकेटप्रेमींना वानखेडे स्टेडिअमबाहेर गोंधळही घातला. 32 हजार आसन क्षमता असलेल्या स्टेडियमवर फक्त 4 हजार तिकिटं विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले क्लब आणि जिमखान्यांना एकूण 17 हजार तिकिटं देण्यात आलीत. तर निमंत्रित, सरकारी खाती, व्हीआयपी अशांना 6 हजाराहून अधिक तिकिटं देण्यात येतात, पण या सर्वात ज्या सामान्य क्रिकेट प्रेमींना क्रिकेटला मोठं केलं, त्यांच्या वाट्याला मात्र अवघी 4 हजार तिकिटं येतात.

तिकिटांचं नेमकं कसं वाटप केलं जातं ?

  • - वानखेडे स्टेडिअमची आसनक्षमता आधी 40,000
  • - नूतनीकरणानंतर स्टेडिअमची आसनक्षमता 32,014
  • - 330 क्लबना प्रत्येकी 25 तिकिटं - एकूण 8,520 तिकिटं
  • - गरवारे क्लबला - एकूण 3,528 तिकिटं
  • - 5 जिमखाने - एकूण 3,853 तिकिटं
  • - प्रायोजक, व्हीआयपी, महापालिका, पोलीस आणि इतर - एकूण 6,200 तिकिटं
  • - सामान्य क्रिकेटप्रेमींच्या वाट्याला केवळ 4500 तिकिटं

First published: November 12, 2013, 1:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading