कॅम्पाकोला : आजची कारवाई उद्यावर

कॅम्पाकोला : आजची कारवाई उद्यावर

  • Share this:

campa 12 नोव्हेंबर : मुंबईतील वरळीतल्या कॅम्पाकोला  इमारतीवर उद्या खर्‍या अर्थाने बुलडोझर चालणार आहे, आज अधिकारी अनधिकृत फ्लॅटचे फक्त मार्किंग करणार आहेत. कॅम्पाकोला परिसरात सध्या  तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सोसायटीचे अनधिकृत मजले पाडण्याची कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक, महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या कॅम्पा कोला परिसरात दाखल झाला आहे.

 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इथले अनधिकृत मजले पाडण्याच्या कारवाईला सकाळी 11च्या सुमारास सुरूवात झाली. ऐकीकडे पोलिस कॅम्पा कोलाच्या इमारतीत जाण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे रहिवासी मात्र त्यांना आत येण्यास् विरोध करत आहेत. रहिवाशांनी महापालिका पथकाला प्रवेश करण्यापासून मज्जाव करत गेटसमोर ठाण मांडल्याने कॅम्पा कोलात तणाव निर्माण झाला आहे.

 

रहिवाशांच्या प्रखर विरोधामुळे महापालिकेने आज कॅम्पा कोलावर कारवाई न करता सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महापालिकेचे पथक या घरांचे  वीज, पाणी आणि गॅसचे कनेक्शन तोडून केवळ मार्किंग करणार आहे. कॅम्पा कोलातील बेकायदेशीर मजल्यांवरील कारवाई तुर्तास टळली आहे. मात्र उद्यापासून या घरांवर हातोडा पडणार असल्याचे सांगितले जाते.

 

कॅम्पाकोला' वर कारवाई

  • कॅम्पाकोला संकुलात 7 इमारती
  • विविध इमारतींमधले 35 मजले अनधिकृत
  • 102 फ्लॅट्सचा समावेश
  • इसा एकता - 6,7 आणि 8 वा मजला
  • बी. वाय. अपार्टमेंट - 6 वा मजला
  • मिड टाऊन अपार्टमेंट - 6 ते 20 पर्यंतचे मजले
  • ऑकिर्ड अपार्टमेंट 6 ते 13 मजले
  • पटेल अपार्टमेंट (अ) 6 वा मजला
  • पटेल अपार्टमेंट (ब) 6 वा मजला

 

 

First published: November 12, 2013, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading