Elec-widget

वाजपेयींची तब्येत स्थिर

वाजपेयींची तब्येत स्थिर

8 फेब्रुवारी दिल्लीमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. थोड्याच वेळापूर्वी त्याच्या तब्येतीबाबत मेडिकल बुलेटीन आलं. त्यात डॉक्टरांनी वाजपेयी यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याचं सांगितलंय. त्यांना 3 तारखेला व्हायरल फिवर झाल्यानं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांची चेस्ट कजेंशनची तक्रार सुरू झाली, त्यानंतर त्यांना न्युमोनियाही झाला. शुक्रवार सकाळपासून त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवायला लागला. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आता त्यांच्या श्वासनलिकेत इन्फेक्शन झालं आणि फुफ्फुसांचं कामही मंदावलंय. पण त्यांचं ब्लड प्रेशर स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. दरम्यान शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी,समाजवादी पार्टीचे नेते अमरसिंग आणि संजय दत्त यांच्यासह अनेक मान्यवरांनी एम्समधे जाऊन वाजपेयींच्या तब्बेतीची विचारपूस केली.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2009 05:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com