भारतातल्या कॉस्मेटिक्स मार्केटवर संक्रात

6 फेब्रुवारी, नवी दिल्ली सत्यार्थ नायकचार आठवड्यात गोरं बनवण्याचं प्रॉमिस कॉस्मॅटीक कंपन्यांच्या जाहिराती नेहमीच देतात. पण आता त्यांना तसं वचन देता येणार नाही. कारण तसं करण्यापूर्वी त्यांना आता वैज्ञानिक कारण द्यावं लागेल. केंद्रीय आरोग्यमंत्री रामदोस यांनी तसं फर्मानंच काढलं. एका आठवड्यात गोरं बनवण्याचं प्रॉमिस देणार्‍या अनेक जाहिराती आपण नेहमीच पाहतो. आणि या जाहिराती पाहून प्रॉडक्टस वापरणार्‍यांची संख्याही कमी नाहीये. खुद्द किंग खानंही त्याला ग्लॅमर दिलंय. पण केंद्रीय आरोग्यमंत्री रामदोस यांनी तंबाखू, अल्कोहोल यांच्यावरच्या बंदीनंतर थेट कॉस्मॅटीक कंपन्यांच्या या जाहिराती बंद करण्याची मागणी केलीय." या जाहिराती थांबल्या पाहिजेत. एका आठवड्यात तुम्ही गोरं होऊ शकता असं जाहिराती म्हणू शकत नाहीत. कॉस्मॅटीक कंपन्यांनी वैज्ञानिक कारणं देणं गरजेचं आहे, " केंद्रीय आरोग्यमंत्री रामदोस यांनी सांगितली.भारतात कॉस्मॅटिक्सचं मार्केट अंदाजे 2000 कोटींचं आहे. गेल्या पाच वर्षात त्यात अंदाजे वीस टक्क्यांनी वाढ झालीये. अनेक कॉस्मॅटीक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात.पण या स्पर्धत उत्पादन चांगलं असण्यावर किती लक्ष दिलं जातं? " त्वचेला घातक ठरू शकतात. यात अनेक केमिकल्स वापरली जातात. असं काही वापरल्यानं चेहर्‍यावर मुरुमं येतात, " असं स्किन स्पेशालिस्टचं म्हणणं आहे. रामदोस यांनी सूचना आणि प्रसारण मंत्र्यांना याबाबत लेखी पत्र पाठवलंय. पण ग्राहकांचंही मत काही औरचं आहे.कंपन्यांनी काही मर्यादा घातली पाहिजे त्यांनी दर्जा टिकवायला पाहिजे, अशी ग्राहकांचं मत आहे. स्पर्धा कितीही असली तरी कंपन्यांनी कॉस्मॅटिक्सच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यायला हवं.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2009 06:28 PM IST

ताज्या बातम्या