कार्तिकीच महाअंतिम फेरी जिंकणार - आळंदीकरांची इच्छा

6 फेब्रुवारी, पुणेप्राची कुलकर्णी सारेगमप लिटील चॅम्प्सची अंतिम फेरी आज रंगणार आहे. इंद्रायणी काठच्या माउलींच्या आळंदीला सध्या वेध लागलेत ते कार्तिकीचे.पण ही काही पंढरपुरची कार्तिकी यात्रा नाही. तर ती आहे सारेगमप मधली लिटिल चॅम्प कार्तिकी. कार्तिकीच महाअंतिम फेरी जिंकणार अशी खात्री आळंदीकरांना वाटतीये. आळंदीचं कृष्णाई विद्यालय म्हणजे कार्तिकीच घर. वडीलच संगीत शिक्षक . त्यामुळं लहानपणापासून तिच्यावर गाण्याचे संस्कार झालेयत. " आमची कार्तिकी खेळता कार्तिकी गाणं शिकली. मग स्वत:च स्वत:ची प्रॅक्टीस करायची, " असं कार्तिकीची आई सुनिता गायकवाड सांगत होत्या. वयाच्या अकराव्या वर्षी कार्तिकीनं अवघ्या महाराष्ट्रातल्या रसिकांची मनं जिंकली आहेत. वसंतोत्सवात तिच्या मन सुद्ध तुझं या गाण्यावर तिनं नाना पाटेकरनाही ताल धरायला लावला होता. तिच्या या यशाचं कौतुक तिच्या आजोबांना वाटतंय. त्यांची कार्तिकी नात असली तरी पाचही मुलं जिंकावीत असं त्यांना वाटतंय.कातिर्कीच्या भावालाही तिच्यासारखाच सुरेल गळा लाभलाय. त्यानं त्याच्या बहिणीला गाणं गाऊन शुभेच्छा दिल्यात. ज्ञानेश्वर मेश्रामच्या रूपानं हुकलेलं सारेगमपचं विजेतेपद कार्तिकीच्या रूपानं तरी मिळेल अशीच आशा आळंदीकरांना वाटतेय.

  • Share this:

First published: February 7, 2009, 6:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या