'KDMC'चे 'बिहार'झाले, सभागृहात पिस्तूलधारी नगरसेवकांची 'डॉन'गिरी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2013 05:03 PM IST

'KDMC'चे 'बिहार'झाले, सभागृहात पिस्तूलधारी नगरसेवकांची 'डॉन'गिरी

kdmc corporationकिरण सोनवणे, कल्याण-डोंबिवली

09 नोव्हेंबर : महापालिकेच्या महासभेत जर नगरसेवकच पिस्तुल घेऊन हजर राहत असतील तर...ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना..पण हे वास्तव आहे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतलं. महापालिकेत नगरसेवकच पिस्तुल घेऊन येत असल्याचं उघडकीस आलंय. यामुळे नगरसेविकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या प्रेक्षागृहातच बंदुकीची काडतुसं सापडली होती. त्यावरुन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल असून, पोलीस त्याचा तपास करत आहेत.

ही आहे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतली पिस्तुल जमा करण्याची केबीन...ज्या नगरसेवकांकडे पिस्तुल आहे, त्यांनी सभागृहात जाण्यापूर्वी त्यांच्याकडची परवानाधारक पिस्तुल इथं जमा करणं अपेक्षित आहे. या महापालिकेतल्या 19 नगरसेवकांकडे पिस्तुल धारण करण्याचा परवाना आहे.

Loading...

हे सगळेजण महासभेत बसण्यापुर्वी किंवा महापालिका आवारात प्रवेश करण्यापुर्वी त्यांच्याकडची पिस्तुल महापालिका नियमानुसार या केबीनमध्ये जमा करावी लागते. परंतु, इकडं कुणीच फिरकत नसल्यानं ही केबीन धूळ खात पडलीय. त्याचा वापर आता महापालिका कर्मचारी त्यांचे डबे आणि कपडे ठेवण्यासाठी करतात. विशेष म्हणजे इथं असलेले पिस्तुल ठेवण्याचं लॉकरही हलवण्यात आलंय. ही बाब गंभीर असल्याचं मत माजी महापौरांनी व्यक्त केलंय. याबाबत महापालिका आयुक्तांनी अत्यंत बेफिकीरीचं उत्तर दिलंय.

महापालिका महासभेत यापुर्वी बर्‍याचदा हाणामारी झाली आहे. त्यातच नगरसेवक महासभेत पिस्तुल घेऊन येत असल्यानं महिला नगरसेवकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. लोकप्रतिनिधीचं जर कायद्याचं उल्लंघन करत असतील, तर मग दाद कुणाकडे मागायची,अशी परिस्थिती सर्वसामान्यांची झालीय. नियम मोडणार्‍या या नगरसेवकांच्या आडमुठेगिरीला आळा बसणार का असा सवाल आता विचारला जातोय.

 या नगरसेवकांकडे परवानाधारक पिस्तूल

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील रवी पाटील (काँग्रेस),रमेश म्हात्रे (शिवसेना), दिपेश म्हात्रे (शिवसेना), कैलाश शिंदे (शिवसेना) मल्लेश शेट्टी (शिवसेना),विकास म्हात्रे (शिवसेना) प्रकाश पेणकर (शिवसेना) बुधाराम सरनौबत (भाजप), बाळ हरदास शेलार (काँग्रेस), जनार्धन म्हात्रे (राष्ट्रवादी), जनार्धन म्हात्रे (राष्ट्रवादी), सचिन पोटे(राष्ट्रवादी), संजय पाटील (काँग्रेस),या नगरसेकांकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेत एकूण 19 नगरसेवकांकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना असून, त्यांची नावे सांगण्यात्स मात्र पोलिसांनी नकार दिलाय. कल्याण डोंबिवली परिसरात सुमारे 1200 लोकांकडे पिस्तूल धारण करण्याचा परवाना असल्याची अधिक माहितीही पोलिसांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2013 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...