आसाराम बापूंवर आरोपपत्र दाखल

  • Share this:

asaram bapu arrest_1236 नोव्हेंबर : लैंगिक अत्याचाराप्रकरणी स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्यासह चौघा जणांवर बुधवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. मानवी तस्करी, षडयंत्र रचणे, धमकावणे, बलात्कार अशा विविध कलमांतगर्त हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.

Loading...

जोधपूर आश्रमातील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूंविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलिसांनी त्यांना १ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेशमधून अटक केली होती.

या प्रकरणी बापूंसह त्यांच्या चौघा सेवकांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पिडीत मुलीने तक्रारीत म्हटले होते. या सर्वांविरोधात आज जोधपूर पोलिसांनी कोर्टात चार्जशीट दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे १४० साक्षीदारांचे जबाब घेतले आहे.  कोर्टाने बापूच्या न्यायालयीन कोठडीत १६ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.  याप्रकरणानंतर आसाराम बापूंचे काळे कारनामे जगासमोर आले होते.

जोधपूरमधील मुलीने दाखवलेल्या धाडसानंतर गुजरातमधील सुरत येथील दोघा बहिणींनीही आसाराम बापू व त्यांचा मुलगा नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी आसाराम बापूंना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी त्यांचा मुलगा नारायण साई अद्याप फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2013 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...