रवी शास्त्रींची निवड करणाऱ्या समितीलाच BCCIची नोटीस

रवी शास्त्रींची निवड करणाऱ्या समितीलाच BCCIची नोटीस

कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआय़ने नोटीस पाठवली असून 10 ऑक्टोंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी शनिवारी कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीला हितसंबंधांवरून नोटिस पाठवली आहे. या समितीमध्ये कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे. या समितीने नुकतीच भारताच्या मुख्य प्रशिक्षकांची निवड केली होती. या समितीविरुद्ध बीसीसीआयच्या संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिघांनाही नोटिसीला उत्तर देण्यासाठी 10 ऑक्टोंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

याआधी बीसीसीआयने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनाही अशा प्रकारची नोटिस पाठवली होती. आता मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी सीएसीमधील सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रवि शास्त्रींची निवड या समितीने केली होती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीएसीच्या सदस्यांना तक्रारीचे उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.

बीसीसीआयच्या नियमांनुसार सीएसीच्या सदस्यांना क्रिकेटमध्ये इतर कोणतीही भूमिका बजावता येत नाही. गुप्ता यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, सीएसीचे सदस्य एकाचवेळी अनेक कामं करत आहेत. कपिल देव सीएसीशिवाय समालोचक, एका कंपनीचे मालक आणि भारतीय क्रिकेटर्स संघाचे सदस्य आहेत. तर गायकवाड हे एका अकादमीचे मालक असून बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त समितीचे सदस्य आहेत.

भारताच्या माजी महिला कर्णधार रंगास्वामी सीएसीच्या सदस्य आहेत. तर आयसीएमध्ये त्या आहेत. सीएसीने डिसेंबरमध्ये महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकांची निवड केली होती.

Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO

Tags: kapil dev
First Published: Sep 29, 2019 08:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading