31 ऑक्टोबर : आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. फास्ट बॉलर झहीर खानला या टीम बाहेर ठेवण्यात आलंय.
तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सीरिजमध्ये खराब कामगिरीनंतरही ईशांत शर्माने टीममध्ये आपली जागा कायम ठेवलीय. अमित मिश्रा, आर अश्विन आणि प्रग्यान ओझा या तीन स्पीन बॉलर्सना संधी देण्यात आलीय. तर ऑलराऊंडर रविंद्र जडेजाला मात्र दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलंय.
रोहित शर्माला टीममध्ये संधी देण्यात आली असून टेस्ट डेब्युसाठी तो सज्ज झालाय. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारकिर्दीतली ही शेवटची टेस्ट सीरिज असणार आहे. त्यामुळे या टेस्टकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
अशी आहे भारतीय टीम
एम.एस.धोणी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन,अमित मिश्रा, प्रग्यान ओझा, उमेश यादव, शमी अहमद, ईशांत शर्मा