नगरच्या शेतकर्‍यांनी वळवलं जायकवाडीचं पाणी

नगरच्या शेतकर्‍यांनी वळवलं जायकवाडीचं पाणी

  • Share this:

jayakwadi dam copy30 ऑक्टोबर : जायकवाडीच्या पाण्यावरुन ऐन दिवाळीच्या तोंडावर नगर विरुध्द मराठवाडा असा संघर्ष सुरु झाला आहे.

 

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्यावरुन वातावरण चांगलच तापलंय.

 

 

आज बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांनी जायकवाडीकडे जाणारं पाणी ओझर बंधार्‍यावरून प्रवरा कालव्यात वळवलं. या शेतकर्‍यांनी ओझर बंधार्‍यावर जाऊन चाकं फिरवून कालव्याचे दरवाजे उघडलेत.

 

त्याचबरोबर जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.तसंच शेतकर्‍यांनी बंधार्‍यावरच धरण आंदोलन केल्यामुळे जायकवाडीत जाणार्‍या पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2013 08:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading