लोहा नगरपालिकेवर मनसेचा झेंडा

लोहा नगरपालिकेवर मनसेचा झेंडा

  • Share this:

Image img_232962_mnspune_240x180.jpg28 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगरपालिकेवर मनसेनं एकाही सत्ता मिळवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिलाय. 17 पैकी 9 जागा जिंकत मनसेनं मराठवाड्यात प्रथमच खातं उघडलंय.

 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. मात्र या दोन काँग्रेसच्या कुरघोडीच्या राजकारणात मनसेनं यश मिळवलंय. काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवलाय, तर राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आलेली नाही.

 

विशेष म्हणजे लोहा विधानसभेचा महासंघ राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडून प्रचारासाठी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी हजेरी लावली होती. तर काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी लोह्यात सभा घेतली होती.

 

यानिमित्ताने प्रथमच दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख आणि अशोक चव्हण पहिल्यांदाच एकत्र आले होते. तर मनसेच्या निवडणूक प्रचाराची धूरा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी सांभाळली होती.

First published: October 28, 2013, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading