मोदींच्या हुंकार रॅलीसाठी 14 ट्रेन्स,3 हजार बसेस बुक

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2013 02:54 PM IST

narendra modi journy26 ऑक्टोबर : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचे नाराळ फोडले आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी मोदींनी सभांचा सपाटा लावलाय. उद्या रविवारी पाटणा इथं मोदींची हुंकार रॅली होणार आहे. ही रॅली यशस्वी करण्यासाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय.

 

यासाठी 14 पेक्षा जास्त रेल्वे आणि 3 हजार बसेसचं बुकिंग करण्यात आलंय. कार्यकर्त्यांना राहण्यासाठी पाटण्यातली जवळपास सर्व हॉटेल्सही बुक करण्यात आली आहेत. जेडीयू सोबत युती तोडल्यानंतर पहिल्यांदाच मोदींची पाटण्यात रॅली होणार आहे त्यामुळे ही रॅली कोणत्याही परिस्थिती यशस्वी व्हावी यासाठी भाजपने जय्यत तयारी केलीय.

 

या अगोदरही मोदींच्या सभेसाठी भाजपने कोणतीही कसर सोडली नाही. मोदींची प्रत्येक सभा वेगळी आणि आकर्षक कशी व्हावी यासाठी भाजपने कोणतीही कसर सोडली. हैदराबाद इथं झालेल्या सभेसाठी तर 5 रूपये तिकीट आकारण्यात आलं होतं.

Loading...

 

दरम्यान, मोदींची आज राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये प्रचार सभा आहे. चारच दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये राहुल गांधींची सभा झाली होती. आणि त्यावेळी केलेल्या भाषणावर मोदींनी कालच्या झाशीतल्या सभेत जोरदार तोफ डागली होती. मोदी आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2013 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...