मुंबई परिसरात डेंग्यूचं थैमान,20 जणांचा मृत्यू

मुंबई परिसरात डेंग्यूचं थैमान,20 जणांचा मृत्यू

  • Share this:

dengu25 ऑक्टोबर : सध्या वेगवेगळ्या आजारांनी मुंबई आणि नवी मुंबई परिसरात थैमानं घातलंय. तर डेंग्युने अनेकांना हैराण केलंय. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात तब्बल 20 जणांचा डेंग्युनं मृत्यू झालाय. तर साडे सातशेपेक्षा जास्त रुग्ण डेंग्युशी झुंज देत आहे. त्यामुळे थोडा जरी ताप आला तरी रक्त तपासण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय.

 

शिवम नवघरे...नऊ महिन्याचं तान्ह बाळ... तापानं फणफणतय म्हणून दवाखान्यात दाखवलं. ताप उतरत नसल्यानं नवी मुंबई महापालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि रक्त तपासणीत डेंग्यू झाल्याचं स्पष्ट झालं. 11 वर्षाचा ऋषीकेश केव्हारेलाही डेंग्युची लागण झालीये. आधी उलट्या, त्या पाठोपाठ ताप आल्यानं वडिलांनी त्याला हॉस्पिटलमधे दाखल केलंय.

 

स्वच्छ पाण्यावर मच्छर जगतात. किंवा रोप लावतो किंवा फेंगशुईचे रोप, टायर ताडपत्री इथे पाणी जमा होतं. त्यामुळे आजार पसरतो. पाणी साठवणूक दिर्घ काळासाठी करु नका. ताप असेल तर तात्काळ रक्त तपासा. मग आटोक्यात आणणं शक्य होतं.

डेंग्यूचं थैमान

  • - नवी मुंबईत सध्या 55 रुग्णांवर उपचार सुरू
  • - नवी मुंबई: यावर्षी 14 रुग्णांचा मृत्यू
  • - मुंबईत 698 रुग्णांवर उपचार सुरू
  • - मुंबई: 6 रुग्णांचा मृत्यू
  • - ठाणे : 10 रुग्णांवर उपचार सुरु
  • - ठाणे : 2 जणांचा मृत्यू

यावर्षी डेंग्युच्या रोगींची संख्या वाढलीये.टिकुन राहिलीये. दरवर्षी हे प्रमाण कमी होताना दिसतं पण यावर्षी दिसंत नाहीये. आतापर्यंत जी आकडेवारी जातेय ती आतापर्यंतच्या महापालिकेच्या पेशंट्सची आहे. आता महापालिकेनं इतर पेशंट्सची आकडेवारी गोळा करायला सुरवात केलीये. त्यामुळे हा आकडा वाढू शकेल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.मुंबई महापालिकेनेही औषधांची फवारणी, विभागवार आरोग्यशिबिरं आयोजित केलीये. नागरिकांनीही स्वच्छता राखण्याचं आवाहनं करण्यात आलंय.

 

First published: October 25, 2013, 11:22 PM IST

ताज्या बातम्या