#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग!

#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग!

सातारा जिल्ह्यातला हा नवा पॅटर्न प्रसिद्ध असून राज्यातल्या शेकडो शिक्षकांना त्याचं त्यांनी प्रशिक्षणही दिलंय.

  • Share this:

( नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. नवरात्रोत्सव म्हणजे नव्या विचारांचं जागरण. नवरात्रोत्सव म्हणजे मांगल्याची सुरूवात. अशा या पवित्र पर्वावर आम्ही तुम्हाला करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख. 'Durgotsav 2018' मधून. या महिलांनी सर्व आव्हानांवर मात करत, संघर्ष करत समाजाला प्रेरणा दिली.)

सातारा जिल्ह्यातल्या सज्जनगडाच्या पायथ्याशी कुमठे परिसरात विस्तार अधिकारी असलेल्या प्रतिभा भराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग 13 वर्ष सातत्याने प्रयोग करून जिल्हा परिषदांच्या 40 शाळांचा सर्वांगिणस्तर उंचावलाय.

2003 पासून कुमठे बिटमध्ये त्यांनी काम सुरू केले. पहिल्यांदा १०० टक्के मुले शाळेत आणण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले. सर्व शाळांसाठी त्यांनी सारखेच 66 उपक्रम एकाच वेळी सुरू केले. मुलांना नापास करायचे नाही हा निर्णय वादाचा बनलेला असताना  2004 मध्ये एकही मूल नापास करायचे नाही हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

त्यासाठी शिक्षकांसाठीही अभिनव साहित्य तयार केलं. हा नवा पॅटर्न राज्यात प्रसिद्ध असून राज्यातल्या शेकडो शिक्षकांना त्याचं त्यांनी प्रशिक्षणही दिलंय. गेली 13 वर्ष 125 शिक्षक या प्रकल्पात काम करताहेत.

असा आहे नवीन प्रयोग

ज्ञानरचनावाद : “पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद  म्हणतात’’

वैशिष्ट्ये  :

घोकंपट्टीपासून सुटका : आकलन करून समजुन अभ्यास करता येतो .

शाळेबाहेरचे जग आणि  शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते

अध्ययन कौशल्यांचा विकास :- श्रवण  , भाषण, वाचन , लेखन ,संभाषण , अभिव्यक्ति या कौशल्याचा विकास करणे सोपे होते.

First published: October 16, 2018, 7:36 AM IST

ताज्या बातम्या