आयपॅड एयर लाँच

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2013 07:49 PM IST

आयपॅड एयर लाँच

02-apple-ipad-ipad-mini-macbook-launch-23101323 ऑक्टोबर : मोबाईल क्षेत्रात दादा कंपनी असलेल्या अ‍ॅपलने आपले दोन नवीन आयपॅड मोठ्या दिमाखात लाँच केलं. मंगळवारी सॅन फ्र ान्सिस्को इथं एका सोहळ्यात आयपॅड एयर आणि आयपॅड मिनी-2 लाँच केलेत. खास बाब म्हणजे आयपॅड एयरमध्ये 9.7 इंच रेटिना डिस्प्ले देण्यात आलाय तर मिनी 2 मध्ये 7.9 इंच रेटिना डिस्प्ले देण्यात आलाय.

 

तसंच या आयपॅडमध्ये वाय-फाय आणि सेल्युलर (3जी) सुविधाही देण्यात आलीय. हे दोन्ही मॉडल्स 16 जीबी, 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी क्षमतेचे असणार आहे. एयर-आयपॉडच्या 16 जीबी वाय फायची किंमत 499 डॉलरपासून सुरु होते, तर 16 जीबी वाय फाय आणि सेल्युलर सोबत याची किंमत 629 डॉलर आहे.

 

आयपॅड मिनी 2 (फक्त 16 जीबी वाय फाय) 399 डॉलर इतकी आहे. यामुळे पूर्वीच्या आयपॅड मिनीचा भाव उतरला आहे. यासोबतच 'मॅकबुक प्रो'चं अपडेटडं व्हर्जन लाँच करण्यात आलंय. या मॅकबुकला 15 इंच आणि 13 इंच स्क्रिन देण्यात आलीय. याची किंमत 1299 डॉलर इतकी आहे.

Loading...

एयर-आयपॅड

- वजन 1 पाउंड

- 9.7 इंच रेटिना डिस्प्ले टच स्क्रिन

- स्टोरेज : 16 जीबी, 32जीबी, 64जीबी, आणि 128जीबी

- रंग : करडा-काळा आणि चंदेरी-पांढरा

- 16 जीबी वाय फायची किंमत 499डॉलर, तर 16 जीबी वाय फाय आणि सेल्युलर सोबत याची किंमत 629 डॉलर

आयपॅड मिनी 2

- वजन 0.73 पाउंड

- 7.9 इंच रेटिना डिस्प्ले टच स्क्रिन

- स्टोरेज : 16 जीबी, 32जीबी, 64जीबी, आणि 128जीबी

- रंग : करडा-काळा आणि चंदेरी-पांढरा

- 16 जीबी वाय फायची किंमत 399 डॉलर

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2013 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...