S M L

पारनेरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी,सुरेश पठारेंवर गुन्हा दाखल

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2013 09:07 PM IST

पारनेरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी,सुरेश पठारेंवर गुन्हा दाखल

parner marhan22 ऑक्टोबर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये शिक्षण संस्थेच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये महिलांनाही बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. 17 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. विशेष म्हणजे या मारहाणीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे माजी सहकारी सुरेश पठारे यांच्यावरही आरोप करण्यात आलेत. साई शिक्षण संस्थेकडून पारनेर तालुक्यात एक शाळा चालवण्यात येते.

 

संस्थेचे विश्वस्त भगवान पठारे आणि अश्विन गिरे यांच्यात अंतर्गत वाद झाला. आणि त्यातून दोन गटांमध्ये 17 ऑक्टोबरला हाणामारी झाली. पठारे गटानं पुरुषांसह महिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप गिरे गटानं केलाय.दोन्ही गटांनी एकमेकांवर गुन्हा दाखल केलाय. राळेगण सिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी, अण्णा हजारेंचे माजी सहकारी सुरेश पठारे आणि शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. हे 15 ही जण स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांना जामीन देण्यात आलाय. 

सुरेश पठारे यांनी आम्हाला बेदम मारहाण केली. सुरेश पठारे मध्यस्थी करण्यासाठी आले नव्हते ते सुद्धा मारहाणीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत सरपंच जयसिंग मापारी आणि निलेश लंके यांनी मला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर यांच्यासोबत असलेली काही लोक दारु पिऊन आम्हाला अमानुष मारहाण केली यावेळी या सर्व मारहाणीची आम्ही एक व्हिडिओ सीडीही पोलिसांकडे दिलीय अशी तक्रार दिपाली गिरे यांनी केली.

 

Loading...
Loading...

मात्र सुरेश पठारे यांनी मारहाणाची आरोप फेटाळून लावलाय. माझा या प्रकरणाशी संबंध नाहीय. राळेगण सिद्धीतील पठारे कुटुंबीयातील सदस्य हे त्या शिक्षण संस्थेत विश्वस्त आहे. त्या संस्थेतील विश्वस्त आणि विश्वस्त यांचातला हा वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी मी आणि सरपंच जयसिंग मापारी प्रकरण मिटवण्यासाठी तिथं गेले होतो. पण तिथे त्यांच्यात बाचाबाची झाली त्यातून त्यांची मारामारी झाली. या मारामारी आमचा बिल्कुल सहभाग नव्हता. केवळ मध्यस्थ म्हणून तिथे गेलो होतो. आम्ही पठारे कुटुंबांच्या बाजून गेलो म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आलाय अशी बाजू सुरेश पठारे यांनी मांडली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे आणि अजून कुणालाही अटक केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2013 07:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close