अखेरच्या टेस्ट मॅचच्या तिकिटांवर सचिनचा फोटो

अखेरच्या टेस्ट मॅचच्या तिकिटांवर सचिनचा फोटो

  • Share this:

sachin in wankhede22 ऑक्टोबर : क्रिकेट ज्यांचा धर्म..सचिन त्यांचा देव...तब्बल दोन दशकं क्रिकेटचं मैदान गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होतोय.  वानखेडेवर होणार्‍या या अखेरच्या मॅचच्या तिकीटांवर सचिनचा फोटो असणार आणि सचिनच्या 51 टेस्ट मॅचची शतकी खेळी छापणार असल्याची घोषणा एमसीएचे नवे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच संपूर्ण मैदानात सचिनचे पूर्वीचे कटआऊट्स लावले जाणार आहे.

 

क्रिकेट कारकिर्दीतली शेवटची टेस्ट मॅच सचिन आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे मैदानावर खेळणार आहे आणि यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनही जोरदार तयारीला लागलंय.

 

तब्बल दोन दशकं क्रिकेटचं मैदान गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होतोय. क्रिकेट कारकीर्दीतली शेवटची टेस्ट मॅच सचिन आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे मैदानावर खेळणार आहे आणि यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनही जोरदार तयारीला लागलंय. सचिनला निरोप देण्यासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. एसमीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: यासाठी पुढाकार घेतलाय. सचिनसाठी ठरवलेल्या कार्यक्रमात काही खास गोष्टींचा समावेश आहे.

- वानखेडे मैदानावर संपूर्णपणे सचिनचे कटआऊट्स

- एका दिवसाचं तिकीट 250, तर 5 दिवसांचं तिकीट 1 हजार रुपये

- प्रत्येक तिकिटावर सचिनचा फोटो आणि शतकी खेळीचा स्कोअर

- सचिनसाठी MCA कडून 500 तिकिटांची व्यवस्था

- एमसीएकडून सचिनला एक खास पोट्रेट भेट देणार

- कांदिवली इथं सचिन तेंडुलकरच्या नावानं जिमखाना

 

आपली शेवटची टेस्ट मॅच मुंबईत वानखेडे मैदानावर व्हावी अशी इच्छा सचिननं व्यक्त केली होती. कारण होतं मातृप्रेम..सचिनच्या आईनं सचिनचा खेळ प्रत्यक्ष स्टेडिअमवर जाऊन कधीच पाहिला नाही. पण शेवटच्या मॅचला सचिनची आई स्टेडिअमवर उपस्थित राहणार आहे. आईला व्हिलचेअरवरुन प्रेसिडेंट बॉक्समध्ये येता यावं यासाठी रॅम्पही बनवला जातोय आणि स्वत: सचिन या कामावर लक्ष ठेवतोय.

या मॅचसाठी खास विकेट तयार करण्यावर एमसीएचा भर असेल. सचिनची वानखेडे मैदानावरची ही मॅच प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी संस्मरणीय असेल हे नक्की..

 

First published: October 22, 2013, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading