आईच्या उपस्थिती सचिन करणार क्रिकेटला अलविदा

आईच्या उपस्थिती सचिन करणार क्रिकेटला अलविदा

  • Share this:

sachin and his mother22 ऑक्टोबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली 200 वी टेस्ट मॅच मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे या मॅचच्या तयारीत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे सचिनची आई रजनी तेंडुलकर या मॅच पाहणार आहे.

 

आपल्या आईला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी स्वत: सचिन तेंडुलकर या तयारीत लक्ष घालतोय. सचिनची आई प्रेसिडेंट बॉक्समधून ही मॅच पाहणार आहे. पण इथला रस्ता आपल्या आईची व्हीलचेअर जाण्यासाठी अरूंद आहे हे लक्षात आल्यावर स्वत: सचिननं एमसीएच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि तिथं रॅम्प पुरवण्याबाबत सांगितलं.

 

सचिनच्या आईनं आतापर्यंत सचिनची कोणतीही मॅच पाहिलेली नाहीये. पण शेवटच्या मॅचला मात्र त्याची आई आणि त्याचं सगळं कुटुंबच आवर्जून हजर राहणार आहे. त्यामळे आपली शेवटची मॅच ही सचिनसाठी खास असणार आहे.

सचिनची शेवटची मॅच

 

  • 1.शेवटच्या मॅचसाठी वानखेडेच्या आजूबाजूला सचिनचे पुर्वीचे कटआऊट्स लावले जातील.
  • 2. या मॅचसाठी एका दिवसाचं तिकीट असेल 250 रू, तर पाच दिवसांचं तिकीट असेल 1 हजार रूपये.
  • 3.प्रत्येक तिकीटावर सचिनचा फोटो आणि त्याच्या 51 टेस्ट मॅचची शतकी खेळी छापणार
  • 4.सचिननं त्याच्यासाठी 500 तिकीटांची विनंती केली आहे. एमसीएनं पॅव्हेलियनमध्ये 200 तर नॉर्थ स्टॅण्डमध्ये 300 तिकीटांची व्यवस्था केली आहे
  • 5. सचिनला त्याच्या निरोपाची भेट म्हणून एक पेंटिंग हवं आहे, एमसीए सचिनच्या घरी एक आर्टिस्ट पाठवणार आहे. सचिन त्याला कशाप्रकारचं पोर्ट्रेट हवं आहे ते निवडेल
  • 6. एमसीएच्या कांदिवलीतल्या महावीर नगर इथल्या क्लबचं नवं नाव असणार आहे- सचिन तेंडुलकर जिमखाना

First published: October 22, 2013, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading