सरकारी नोकर्‍यांमध्ये मुस्लिमांना 8 टक्के आरक्षण द्या !

सरकारी नोकर्‍यांमध्ये मुस्लिमांना 8 टक्के आरक्षण द्या !

 • Share this:

muslim in goverment job22 ऑक्टोबर : मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर उच्च शिक्षण आणि सरकारी नोकर्‍या आणि पोलीस दलात आठ टक्के आरक्षण देणं आवश्यक आहे, असा अहवाल रहमान समितीने दिलाय.

 

मुस्लीम समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या डॉ.महेमदूर रहमान समितीने सोमवारी आपला अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला. विविध क्षेत्रात मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करून उपाय सुचवण्याबाबत राज्य सरकारने 2008 मध्ये ही समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

या समितीने ज्या काही शिफारसी केल्यात त्यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. या आधी मदरशांना मदत करण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यावर भाजप आणि शिवसेनेनं जोरदार टीका केली होती. निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्याक समाजाला खूश करण्यासाठी हे निर्णय घेण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

 

 डॉ. रहमान अभ्यासगटाचा अहवाल

 

 • - मुस्लिमांच्या सर्वांगिण विकासासाठी मुस्लिमांना सरकारी आणि खाजगी नोकरी आणि शिक्षणामध्ये 8 टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आलीय
 • - हाऊसिंग सोसायट्यांमध्ये फ्लॅट्स आरक्षित ठेवण्याचीही शिफारस आहे
 • - या 8 टक्क्यांमधलं एक तृतियांश आरक्षण मुस्लीम महिलांना असावं
 • - तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या निर्दोष मुस्लीम युवकांच्या प्रकरणांची फेरचौकशी करावी
 • - मुस्लिमांच्या शैक्षणिक संस्थांना विशेष अनुदान द्यावं
 • - मागासलेल्या मुस्लिमांना ओबीसीमध्ये सामावून घ्यावं
 • - दलित मुस्लिमांना अनुसूचित जातींमध्ये सामावून घ्यावं
 • - सर्व सरकारी निवड समित्यांवर मुस्लिमांची नेमणूक व्हावी
 • - मुस्लिमांबाबतचा दुजाभाव थांबवण्यासाठी ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे विशेष कायदा करावा
 • - मुस्लिमांमधली नकारात्मक भावना संपवण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागावर विशेष जबाबदारी सोपवण्याची गरज असल्याची शिफारस करण्यात आलीय
 • - हज हाऊस व्यवस्थापनात सरकारी हस्तक्षेप नको
 • - वक्फ बोर्डाची फेररचना व्हावी आणि त्यातल्या कारभाराची चौकशी व्हावी
 • - मुस्लीम समुदायाशी संबंधित ऐतिहासिक वास्तुंचे जतन करावे

 

 महाराष्ट्र :मुस्लीम समाजाची स्थिती

 

 • - लोकसंख्येची टक्केवारी :10.6%
 • - साक्षरतेचा दर :78.1%
 • - पुरूष पदवीधरांची टक्केवारी :2.2%
 • - महिला पदवीधरांची टक्केवारी :1.4%
 • - बीपीएल (शहरी भाग) :59.4%
 • - बीपीएल(ग्रामीण भाग) :59.8%
 • - प्रशासनात मुस्लीम नोकरदार : 4.4%
 • - मुस्लीम आयएएस अधिकारी : शून्य
 • - तुरुंगातील मुस्लीम कैदी : 32-35%

 

First published: October 22, 2013, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading