प्रेयसीला अ‍ॅसिड पाजून जीव मारण्याचा प्रियकराचा प्रयत्न

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2013 08:38 PM IST

kolhapur crime19 ऑक्टोबर : प्रियकराने आपल्या प्रेयसीला अ‍ॅसिड पाजून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोराई बीचवर घडली आहे. यात युवती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तुंगा रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर जितेंद्र सकपाळ या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

 

धक्कादायक प्रकार म्हणजे या मुलीवर उपचार करायला महापालिकेच्या भगवती आणि शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांनी नकार दिला होता. त्यामुळे तिला मिरा रोड वरील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही युवती 18 वर्षांची असून ती काजूपाडा दहिसरची रहिवाशी आहेत. त्या दोघात प्रेमसंबंध होते. यापुर्वी या प्रेमप्रकरणातून त्यांच्यात भांडणं देखील झालीत. या भांडणातून या मुलीनं दहिसर पोलिसांत प्रियकराविरोधात गुन्हाही दाखल केला होता.

 

आज या मुलानं तिला फिरण्याच्या बाहण्यानं गोराई बीचवर नेलं. त्याठिकाणी कोल्ड्रिक्स मधून अ‍ॅसिड पाजलं. त्यानंतर तिला समुद्रात फेकून देऊन जितेंद्र फरार झाला. बीचवरील स्थानिकांनी मुलीला जखमी अवस्थेत भगवती रुग्णालयात नेण्यात आलं पण या रुग्णालयानं तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर तिला तुंगा रुग्णालयात भरती करण्यात आलंय. दरम्यान, पोलिसांनी काही तासात तिच्या प्रियकाराला अटक केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2013 08:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...