...तर पवार-तटकरे जेलमध्ये जातील-तावडे

...तर पवार-तटकरे जेलमध्ये जातील-तावडे

  • Share this:

vinod tavade15 ऑक्टोबर : सिंचन घोटाळ्याबाबत भाजपनं सादर केलेल्या पुराव्यांची सखोल चौकशी झाली तर अजित पवार आणि सुनील तटकरे लालू प्रसाद यादव सारखे जेलमध्ये जातील, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलाय.

 

बहुचर्चित सिंचन घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या माधवराव चितळे समितीच्या कार्यकक्षेवरून वाद निर्माण झाला होता. समिती  त्रयस्थांकडून कुठलीही कागदपत्रं किंवा पुरावे घेत नसल्याची तक्रार विनोद तावडे यांनी केली होती.

 

यावर मुंबई हायकोर्टानेसुद्धा सरकारला जाब विचारला आणि आता अखेरीस माधव चितळे यांनी तावडेंना त्यांच्याकडचे पुरावे सादर करायला सांगितलंय. त्यानुसार लवकरच विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस चितळे समितीसमोर सिंचन घोटाळ्याची कागदपत्रं आणि पुरावे सादर करतील.

 

या पुराव्यांची सखोल चौकशी झाली तर लालू प्रसाद यादव यांच्या प्रमाणेच अजित पवार आणि सुनील तटकरे जेलमध्ये जातील, अशी तोफ विनोद तावडे यांनी डागलीय. यासंदर्भात त्यांनी राज्यपालांकडेसुद्धा चितळे समितीच्या कारभारावर देखरेख ठेवण्याची मागणी केलीय.

 

तसंच आदर्श घोटाळा महाराष्ट्राल कलंक लावणारा घोटाळा आहे यामुळे एका मुख्यमंत्र्याला घरी जावं लागलं. काही प्रशासकीय अधिकारी तुरुंगात गेले. कमिशन ऑफ एन्क्वायरी एक्टनुसार हा अहवाल 6 महिन्यात विधानसभेत सादर केला पाहिजे.

 

19 एप्रिलला अहवाल सादर झाला 20 ऑक्टोबरला 6 महिने पूर्ण होतील. आणि विधिमंडळात हा त्यांनी ठेवला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी राज्यपालांना भेटून विशेष अधिवेशन बोलवा अशी आम्ही मागणी केलीय आणि ज्यात हा अहवाल सरकारच्या एटीआरसह चर्चा घेण्याची आमची आग्रही मागणी असल्याचंही तावडे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2013 09:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading