अदनान सामीला देश सोडण्याची नोटीस

अदनान सामीला देश सोडण्याची नोटीस

  • Share this:

adnan sami15 ऑक्टोबर : पाकिस्तानी गायक अदनान सामीला व्हिसा संपल्यानंतरही मुंबईत राहिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी देश सोडण्याची नोटीस बजावली आहे. व्हिसा संपल्यानंतरही भारतात राहण्याबद्दल अदनानकडून सात दिवसात स्पष्टीकरण मागण्यात आलंय. एक तर व्हिसा नुतणीकरण करून घ्या अन्यथा देश सोडा असे आदेश पोलिसांनी दिलेत.

 

जर अदनान योग्य स्पष्टीकरण दिलं तर त्याला भारतात राहण्यासाठी आणखी 30 दिवसांची मुदत मिळू शकते. अदनान सामी गेल्या 14 वर्षांपासून भारतात राहतोय. मागिल वर्षी अदनानने 26 सप्टेंबर 2012 ते 6 ऑक्टोबर 2013 पर्यंत व्हिसा नुतणीकरण केलं होतं. मात्र 6 ऑक्टोबर रोजी अदनानच्या व्हिसाची मुदत संपली.

 

मध्यंतरी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर अदनानने कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पण जर व्हिसा संपला असेलच तर भारतात राहून उपयोग नाही तुम्ही पाकला गेलेलं बरं अशा शब्दात अदनानला मनसेनं ठणकावून सांगितलं.

 

मात्र अदनानने व्हिसा नुतणीकरणाचं काम सुरू आहे अशी बाजू मांडलीय. आता अदनानकडे सात दिवसांची मुदत असून त्याला पोलिसांना याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं आहे अन्यथा त्याला भारतातून निघावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2013 01:21 PM IST

ताज्या बातम्या