मंदिराजवळून प्रेतयात्रा नेली म्हणून दलित वस्तीवर बहिष्कार

मंदिराजवळून प्रेतयात्रा नेली म्हणून दलित वस्तीवर बहिष्कार

  • Share this:

buldhana dalit15 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या पुरोगमीपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. एकीकडे जात पंचायतीची अरेरावी सुरू आहे, दुसरीकडे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून दलितांवरच्या बहिष्काराच्या घटनाही घडतायेत. अशीच घटना घडलीये बुलडाणामध्ये. हरिनाम सप्ताह सुरू असताना, गावातल्या मंदिरासमोरून दलितांनी प्रेतयात्रा नेली म्हणून संपूर्ण गावानं दलित वस्तीवर बहिष्कार टाकण्याचा प्रकार समोर आलाय.

 

प्रेतयात्रा नेल्यानं अपशकुन झाल्याचं सांगत हा सामूहिक बहिष्कार टाकण्यात आलाय. जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात वैरागड या गावामध्ये ही घटना घडलीये. गावातल्या मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू असताना दलित वस्तीतली एक प्रेतयात्रा मंदिरासमोरून जात होती. तिला गावकर्‍यांनी अपशकुन झाल्याचं सांगत विरोध केला. तिथून वादाला सुरूवात झाली. त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी बुद्ध विहारातसमोरच्या पिंपळ वृक्षाची पुजा करण्यावर आक्षेप घेण्यात आला.

 

गावातले दलित धम्म चक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला निघाले असताना गावातले सरपंच आणि भाजपने नेते अमोल साठे यांनी त्यांच्यावर रस्त्यात हल्ला चढवला. त्यात महिला आणि लहान मुलं जखमी झाले. मात्र पोलिसांनी दलित वस्तीतल्या 20 लोकांवर दरोडे टाकल्याचे खोटे गुन्हे नोंदवले असा आरोप महिलांनी केलाय. या प्रकरणी इतर समाजातल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केलीय. दलित वस्तीत 35 ते 40 कुटुंब रहातात, तर त्यांच्यावर बहिष्कार टाकणार्‍या गावकर्‍यांच्या घरांची संख्या जवळजवळ 500 इतकी आहे.

 दलित वस्तीवर बहिष्कार

  • - दलितांना शेतीची आणि रोजगाराची कामं देणं बंद
  • - दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीला मनाई
  • - विहिरीवर पाणी भरू दिलं जात नाही
  • - महिलांना गिरणीवर धान्य दळता येत नाही
  • - कधी कधी रिक्षा, बसमध्ये चढू दिलं जात नाही
  • - दहशतीमुळे वस्तीतल्या मुलींचं शाळेत जाणं बंद
  • - धम्मचक्र परिवर्तनदिनी बुद्ध विहारासमोर पिंपळ वृक्षाची पुजा करण्यास आक्षेप
  • - नागपूरला निघालेल्या कार्यकर्त्यांना संरपंचांची मारहाण
  • - दलितांवरच दरोडे टाकल्याचे खोटे गुन्हे नोंदवले, दलित महिलांचा आरोप

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2013 03:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading