सचिनची अखेरची कसोटी वानखेडेवरच

सचिनची अखेरची कसोटी वानखेडेवरच

  • Share this:

sachin tendulkar15 ऑक्टोबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या होम ग्राउंडवरच निवृत्त होणार आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली फिक्चर्स समितीची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत वानखेडे मैदानावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

 

आपली शेवटची टेस्ट मॅच मुंबईतल्या वानखेड मैदानावर खेळवावी अशी इच्छा सचिननं व्यक्त केली होती. त्याच्या इच्छेनुसार ही टेस्ट मॅच मुंबईतच खेळवण्यात येणार आहे.

 

14 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान मुंबईच्या वानखेडे मैदानावर सचिन आपली 200वी टेस्ट मॅच खेळेल. तर वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली मॅच 6 ते 10 नोव्हेंबरदरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डवर खेळवण्यात येणार आहे.

First published: October 15, 2013, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading