बाळासाहेबांचं स्मारक न होण्यास नेतृत्व कारणीभूत-मनोहर जोशी

बाळासाहेबांचं स्मारक न होण्यास नेतृत्व कारणीभूत-मनोहर जोशी

  • Share this:

manohar joshi11 ऑक्टोबर : जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते आणि आणि प्रबोधनकारांचं स्मारक बांधायचं असतं आणि त्याला सरकारनं विरोध केला असता तर बाळासाहेबांनी हे सरकार पाडलं असतं. बाळासाहेबांचं स्मारक न होण्यास नेतृत्व कारणीभूत आहे असा घणाघाती टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे हाणला.

 

स्मारकासाठी आंदोलन करण्याचा पुढाकार नेतृत्त्वाने घेतला पाहिजे, त्यावेळच्या आंदोलनात मी आघाडीवर असेन, असंही वक्तव्य मनोहर जोशींनी केलं. तसंच उद्धव आणि राज ठाकरे एकाच गोष्टीसाठी लढतायत. काँग्रेसला दूर करण्यासाठी या दोघांनी लवकरात लवकर एकत्र यावं असं आवाहनही जोशी यांनी केलं.

 

मुंबईत दादर इथं नवरात्र उत्सवानिमित्त मनोहर जोशी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. गेल्या कित्येक दिवसांपासून मनोहर जोशी नाराज असल्याची चर्चा होती आज या मुलाखतीच्या निमित्ताने जोशी सरांनी शिवसेना आणि उद्धव यांच्या नेतृत्वाचा पाढाच वाचून दाखवला.

 

उद्धव यांना टोला

समजा तुम्ही वयानुसार काम करू शकत नसाल तर ठीक आहे. पण जर वय वाढलेलं असताना जर काही मंत्री चांगलं काम करत असतील आणि ते तुम्हाला चालत असतील. तर मग मनोहर जोशी का नाही चालत? असा थेट सवाल मनोहर जोशी यांनी उद्धव यांना विचारला. तसंच मी नेतृत्वाला दोष देत नाही. पण आजचं नेतृत्व हे सुद्धा वेगळ्या प्रकारे शिवसेनेला पुढेच नेत आहे. पण बाळासाहेबांच्या स्मारकाला उशीर होतोय याबद्दल शिवसैनिकांमध्ये संताप आहे. शेवटी पुन्हा बाळासाहेबांच्याच कार्यपद्धतीनेच आपल्याला न्याय मिळवावा

लागेल. कल्पना करा जर बाळासाहेबांना प्रबोधनकार ठाकरे यांचं स्मारक बांधायचं असतं आणि काँग्रेसच काय दुसरं कोणतही सरकार सत्तेवर असतं आणि त्यांनी विरोध केला असता तर ते सरकार पाडून दाखवण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये होती अशी आठवणही जोशी यांनी करून दिली.

 

'राज-उद्धव यांनी एकत्र यावं'

मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच गोष्टीसाठी लढत आहे. दोघंचं ध्येयही तेचं आहे. फक्त काम करण्याची पद्धत वेगळी आहे. बाळासाहेबांनी काँग्रेसविरोधात लढा दिला. आता हे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी दोघांनी लवकरात लवकर एकत्र यावं असं आवाहनही मनोहर जोशी यांनी केलं.

 

 

मुख्यमंत्र्यांवर टीका

आज आलेल्या या मुख्यमंत्र्यांना दुर्देवाने बाळासाहेबांची कामाची पद्धतच समजली नाही. त्यांच्या कामाची फक्त त्यांना झलक पाहण्यास मिळाली. पण बाळासाहेबांच्या जो बहारीचा कार्यक्रम होता तो मुख्यमंत्र्यांना पाहिला नाही. म्हणून हे मुख्यमंत्री आज काहीही ऐकून घेण्यास तयार नाही. कायदे,नियम दाखवतात. शिवाजी पार्कवर स्मारक करायचं असेल तर ही परवानगी पाहिजे, ती परवानगी पाहिजे अशी कारण सांगतात. अडचणी सांगणार्‍या या मुख्यमंत्र्यांना मी सांगतोय, या महाराष्ट्रात मराठी माणूस जगला, वाढला स्वाभिमानाने मुंबई सारख्या शहरात फिरतो याच कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर बाळासाहेबांनी जे काम केलं त्यामुळे हे सगळं घडतंय असंही जोशी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2013 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading