Elec-widget

सचिनची अखेरची कसोटी वानखेडेवर?

सचिनची अखेरची कसोटी वानखेडेवर?

  • Share this:

sachin in wankhede11 ऑक्टोबर : 'क्रिकेट ज्यांचा धर्म...सचिन त्यांचा देव...' गेल्या 24 वर्षांपासून मैदानावर चौफेर फटकेबाजीनं क्रिकेट चाहत्यांचा मनावर अधिराज्य गाजवणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं 200 व्या टेस्टनंतर निवृत्तीची घोषणा केलीय. 18 नोव्हेंबरला वेस्ट इंडिजविरुद्ध होणारी टेस्ट मॅच सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीतली शेवटची मॅच असणार आहे.

 

पण या मॅचची जागा मात्र अजून निश्चित झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनची शेवटची टेस्ट मॅच आपल्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे मैदानावर होणार आहे. बीसीसीआयची मंगळवारी बैठक होणार असून यात जागा निश्चित केली जाणार आहे.

 

सचिन आणि वानखेडे मैदान याचं अतूट नातं आहे. घरच्या मैदानावर सचिनने अनेक विक्रम केलेत. सचिनने गुरूवारी आपल्या पत्रात 200 कसोटी घरच्या मैदानावर खेळणार असून यासाठी मी उत्सुक आहे असंही म्हटलंय. आता मंगळवारी बीसीसीआयची बैठक होत असून या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2013 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...