असा झाला साखर कारखान्यांत गैरव्यवहार !

असा झाला साखर कारखान्यांत गैरव्यवहार !

 • Share this:

Image img_108672_sugar_240x180.jpg09 ऑक्टोबर : साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्रीवरून होत असलेल्या आरोपांमुळे सध्या सहकार क्षेत्र चांगलंच ढवळून निघालंय. राज्यातल्या 40 सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत 10 हजार कोटींचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी केला.

गेल्या आठ वर्षात 40 सहकारी साखर कारखाने बेकादेशीरित्या विकण्यात आले. या घोटाळ्यात सहकारी साखर कारखान्यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता विकली गेली

. या संपूर्ण घोटाळ्यात अजित पवार यांच्या संबंधित सहा कंपन्यांनी कारखाने विकले आणि त्यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील, अशोक चव्हाण, अमित देशमुख, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, फौजिया खान अशा अनेक नेत्यांनी सहकारी साखर कारखाने लाटले असा आरोप माजी आमदार माणिकराव जाधव यांनी केलाय. नेमका सहकारी साखर कारखान्यांतला हा गैरव्यवहार कसा झाला, ते पाहूया...

असा झाला गैरव्यवहार!

 • - 2005 पासून सहकारी साखर कारखाने आजारी पडायला सुरुवात
 • - 2005: 202 पैकी 165 कारखान्यांचाच गाळप हंगाम होऊ शकला
 • - 2012: केवळ 108 साखर कारखान्यांनी गाळप केला
 • - संचालकांमधले अंतर्गत वाद आणि त्यांच्या भ्रष्टाचारामुळे कारखाने अडचणीत
 • - बँकांकडून कर्ज आणि सरकारकडून पॅकेज मिळूनही कारखाने आजारीच
 • - आर्थिक संकटामुळे 40 कारखाने जप्त, बुडित कर्ज वसूल करण्यासाठी लिलाव
 • - संगनमताने बंद झालेल्या कारखान्यांचे संगनमतानेच लिलाव झाल्याचा आरोप
 • - कोट्यवधींचे कारखाने कवडीमोल किमतींना राजकारण्यांनी विकत घेतले
 • - विकत घेणार्‍या संस्था आणि कंपन्यांमध्ये सर्वपक्षीय राजकारण्यांचे हितसंबंध
 • - सहकारी कारखाने डबघाईला येत असताना, तेच खासगी झाल्यावर मात्र तेजीत
 • - कारखान्याची विक्री होताना सभासद शेतकरी आणि कामगारांना वार्‍यावर सोडलं
 • - राजकारण्यांना कारखाने मिळाले, पण शेतकरी, बँका आणि सरकारचं मोठं नुकसान

===================================================================

सहकारी साखर कारखान्यांवर डल्ला? यांनी घेतले कारखाने विकत

===================================================================

अजित पवार

- उपमुख्यमंत्री

- 6 साखर कारखाने

===================================================================

अशोक चव्हाण

- माजी मुख्यमंत्री

- 2 साखर कारखाने

===================================================================

जयंत पाटील

- ग्रामविकास मंत्री

- 2 साखर कारखाने

===================================================================

नितीन गडकरी

- नेते, भाजप

- 2 साखर कारखाने

===================================================================

एकनाथ खडसे

- विरोधी पक्षनेते, विधानसभा

- 1 साखर कारखाना

===================================================================

छगन भुजबळ

- सार्वजनिक बांधकाम मंत्री

- 1 साखर कारखाना

===================================================================

राजेश टोपे

- उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

- 1 साखर कारखाना

===================================================================

फौजिया खान

- शालेय शिक्षणमंत्री

- 1 साखर कारखाना

===================================================================

रजनी पाटील

- खासदार, काँग्रेस

- 1 साखर कारखाना

===================================================================

महादेवराव महाडिक

- आमदार, काँग्रेस

- 1 साखर कारखाना

===================================================================

विनय कोरे

- आमदार, जनसुराज्य पक्ष

- 1 साखर कारखाना

===================================================================

संजय काका पाटील

- आमदार राष्ट्रवादी

- 1 साखर कारखाना

===================================================================

आंदोलकांच्या मागण्या

 • - बंद सहकारी साखर कारखान्यांची चौकशी करून दोषींना शिक्षा द्या
 • - अशा कारखान्यांचं पुनर्वसन करा
 • - कारखान्यांची विक्री न करता ते कॉर्पोरेशनकडून चालवावेत
 • - कॉर्पोरेशनमध्ये आयएएस दर्जाचा व्यवस्थापक नेमावा
 • - वीस वर्षांच्या भाडेपट्टीवर कारखाना देण्याचा निर्णय सरकारनं मागं घ्यावा
 • - कारखान्यांचे शेअर्स घेतलेल्या शेतकर्‍यांचे पैसे व्याजासह परत करा
 • - शेतकर्‍यांची ऊस बिलाची 1200 कोटींची थकीत रक्कम द्या
 • - बंद कारखान्यातल्या कामगारांना दरमहा तीन हजार रुपये बेकारी भत्ता द्या
 • - कामगारांचं आठशे कोटींचं थकीत वेतन द्या
 • - कामगारांच्या पेन्शन रकमेत सात हजार रुपयांपर्यंत वाढ करा
 • - यापुढे भाडेतत्वावर कारखाने चालवू नयेत
 • - 18% वेतनवाढीची काटेकोर अंमलबजावणी हवी

First published: October 9, 2013, 10:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading