'गुगल'वरही नरेंद्र मोदी हिट, राहुल गांधी दुसर्‍या नंबरवर

'गुगल'वरही नरेंद्र मोदी हिट, राहुल गांधी दुसर्‍या नंबरवर

  • Share this:

narendra modi on rahul gandhi09 ऑक्टोबर : काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जंग जंग पछाडलंय. आपला नेता सर्वश्रेष्ठ असून तोच पंतप्रधान होणार अशी धुराळं कार्यकर्त्यांनी उडवलीय. पण भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि विशेष करून मोदींच्या समर्थकांना गुगल सर्च इंजिन या वेबसाईटने आनंदाची बातमी दिलीय.

 

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना सध्या गुगलवर सर्वात जास्त पसंती मिळतीय. गुगल युजर्स सध्या सर्वात जास्त माहिती मिळवतायत ती नरेंद्र मोदींबद्दल. त्यानंतर नंबर लागतोय तो काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधीचा. त्यामुळे इंटरनेटवर तरी सध्या मोंदीनी राहुल गांधींना मागे टाकलंय.

 

हा सर्वे मार्च ते ऑगस्ट दरम्यान घेण्यात आला होता. तसंच राष्ट्रीय पक्षांमध्येही भाजपला ही गुगलवर सर्वात जास्त मागणी आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा नंबर लागतोय. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच नरेंद्र मोदींचा सोशल साईटवर दबदबा आहे. फेसबूक, टिवट्‌र, युट्युबवर मोदींची मोठी आघाडी आहे. मोदींच्या टिवट्‌र अकाऊंटवर तब्बल 25 लाखांहून जास्त फॉलोवर्स आहे. तर फेसबूकवर मोदींच्या फॅनपेजला तब्बल 51 लाखांपेक्षा जास्त लाईक आहे.

First published: October 9, 2013, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading