'सरकारनं 40 साखर कारखाने कवडीमोल भावानं विकले'

  • Share this:

sakhar karkhane3308 ऑक्टोबर : गेल्या 8 वर्षांत राज्यातले 40 सहकारी साखर कारखाने सरकारनं बेकादेशीरित्या विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी केलाय. या सगळ्या प्रक्रियेत तब्बल दहा हजार कोटींचा घोटाळा झालाय.

सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या संगनमतानं सहकारी साखर कारखान्यांचा कणा मोडल्याचंही त्यांनी म्हटलंय. या घोटाळ्यात सहकारी साखर कारखान्यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता विकली गेली. तसंच शेतकरी, सभासद आणि कामगारांचे सुमारे 800 कोटी रुपयेसुद्धा बुडवले गेलेत.

या संपूर्ण घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संबंधित कंपन्यांनी 6, छगन भुजबळ, जयंत पाटील, अशोक चव्हाण, अमित देशमुख, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, फौजिया खान अशा अनेक नेत्यांनी सहकारी साखर कारखाने लाटले असा आरोप माजी आमदार माणिकराव जाधव यांनी केलाय. या संपूर्ण घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी अण्णा हजारेंनी केलीय.

या मागणीसाठीच उद्या दुपारी 12 वाजता अण्णा हजारे आणि मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार गोविंदराव आदिक हे सुद्धा सहभागी होणार आहेत.

===================================================================

सहकारी साखर कारखान्यांवर डल्ला? यांनी घेतले कारखाने विकत

===================================================================

अजित पवार

- उपमुख्यमंत्री

- 6 साखर कारखाने

===================================================================

अशोक चव्हाण

- माजी मुख्यमंत्री

- 2 साखर कारखाने

===================================================================

जयंत पाटील

- ग्रामविकास मंत्री

- 2 साखर कारखाने

===================================================================

नितीन गडकरी

- नेते, भाजप

- 2 साखर कारखाने

===================================================================

एकनाथ खडसे

- विरोधी पक्षनेते, विधानसभा

- 1 साखर कारखाना

===================================================================

छगन भुजबळ

- सार्वजनिक बांधकाम मंत्री

- 1 साखर कारखाना

===================================================================

राजेश टोपे

- उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

- 1 साखर कारखाना

===================================================================

फौजिया खान

- शालेय शिक्षणमंत्री

- 1 साखर कारखाना

===================================================================

रजनी पाटील

- खासदार, काँग्रेस

- 1 साखर कारखाना

===================================================================

महादेवराव महाडिक

- आमदार, काँग्रेस

- 1 साखर कारखाना

===================================================================

विनय कोरे

- आमदार, जनसुराज्य पक्ष

- 1 साखर कारखाना

===================================================================

संजय काका पाटील

- आमदार राष्ट्रवादी

- 1 साखर कारखाना

===================================================================

First published: October 8, 2013, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading