शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच,कोर्टाची सशर्त परवानगी

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच,कोर्टाची सशर्त परवानगी

  • Share this:

dasara melava sehiv sena08 ऑक्टोबर : अखेर शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्याचा अडथळा आता दूर झाला असून शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबई हायकोर्टाने शिवसेनेला दिलासा दिलाय मात्र यावेळी मेळाव्यासाठी काही अटी घातल्या आहेत. या अटीसहच दसर्‍या मेळाव्याला हायकोर्टाने परवानगी दिलीय.

 

त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा आता शिवाजी पार्कवरच होणार हे निश्तित झालंय. पाच तासाच्या सुनावणीनंतर ही परवानगी दिली गेली आहे. मागच्या वर्षी कोर्टाने मेळाव्याला परवानगी देताना काही अटी लादल्या होत्या आणि हा निर्णय महापालिकेनं घ्यावा अशी सुचनाही केली होती.

 

मात्र महापालिकेनं यंदाच्या वर्षी होणार्‍या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे परवानगी देता येणार नाही परवानगी हवी असल्यास कोर्टाकडून घ्यावी असं पालिकेनं स्पष्ट केलं.

 

पालिकेनं नकार दिल्यामुळे शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली यावर आज कोर्टात तब्बल 5 तास सुनावणी झाली आणि अखेरीस कोर्टाने दसर्‍या मेळाव्याला हिरवा कंदील दाखवलाय.

First published: October 8, 2013, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading