शिवसेनेचे चौगुले,घाडी मनसेत करणार पुन:प्रवेश

  • Share this:

Image img_216742_senamns34_240x180.jpg07 ऑक्टोबर : लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत तसे राजकीय पक्षात हालचालींना वेग आलाय. कुठे फोडाफोडीचे राजकारण तर कुठे बंडखोर उमेदवार आपल्यासाठी जागा शोधत आहे. मनसेतून बाहेर पडलेले राजा चौगुले आणि संजय घाडी मनसेत पुन:प्रवेश करणार आहे.

 

मनसेतून बाहेर पडल्यानंतर दोन्ही नेते शिवसेनेत दाखल झाले होते. शिवसेनेचे उपनेते राजा चौगुले आणि संजय घाडी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीये. दसर्‍याच्या दिवशी हे दोन्ही नेते मनसेत प्रवेश करणार आहेत. मनसेच्या स्थापनेवेळी हे दोन्ही नेते राज ठाकरेंसोबत होते.

 

पण काही काळानंतर स्थानिक स्तरावरच्या मतभेदांमुळे या दोन्ही नेत्यांनी मनसे सोडून सेनेत प्रवेश केला. पण आता शिवसेनेतही हवा तसा मान न मिळाल्यानं पुन्हा एकदा ते मनसेत प्रवेश करणार आहेत.विशेष म्हणजे मनसेचे कन्नडचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहे. एका आमदाराच्या मोबदल्यात मनसेनं सेनेचे दोन उपनेते मिळवले अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली.

First published: October 7, 2013, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading