आठवलेंना 3 जागांची युतीकडून ऑफर

आठवलेंना 3 जागांची युतीकडून ऑफर

  • Share this:

Image img_192642_punemahayuti_240x180.jpg04 ऑक्टोबर : महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाला आज निर्णायक वळण मिळालं. आरपीआयला लोकसभेच्या तीन जागा सोडण्याची तयारी शिवसेना-भाजपनं दाखवलीय.

 

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी आज शुक्रवारी संध्याकाळी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत सातारा आणि लातूरची जागा देण्याबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. मात्र तिसरी लोकसभेची जागा आठवले मागत असले तरी त्यावर एकमत होऊ शकलेलं नाही.

 

आठवलेंना राज्यसभेची जागा हवी असल्यास ती भाजपाच्या कोट्यातून मागा, असा प्रस्ताव शिवसेनेनं रामदास आठवलेंना दिलाय. जागावाटपावरून आठवले सध्या नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी यापूर्वी बोलून दाखवलीये. कालच आठवले यांनी मायावतींसोबत युती करण्याबाबत वक्तव्य केलं होतं.

First published: October 4, 2013, 8:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading