जन्मदात्यांची काळजी न घेणार्‍यांची सरकार घेणार झाडाझडती

जन्मदात्यांची काळजी न घेणार्‍यांची सरकार घेणार झाडाझडती

  • Share this:

elders330 सप्टेंबर : आपल्या मुलांसाठी राबराब राबून त्यांचे लाड, हट्ट पूरवण्यात प्रत्येक आई-वडिलांचं आयुष्य खर्ची जातं..पण ज्यांना लहानांचं मोठं केलं शिकवलं, संसार थाटून दिला त्यांनाच आपल्या जन्मदात्यांना सांभाळता येत नाही किंवा त्यांना त्यांचा विसरच पडतो अशा मुलांना धडा  शिकवण्यासाठी राज्य सरकारने नवे धोरण लागू केले आहे.

 

या धोरणानुसार जी मुलं आपल्या पालकांची काळजी घेणार नाहीत त्यांची चौकशी करून त्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येतील असा महत्त्वाचा निर्णयही या धोरणांअंतर्गत घेण्यात आला आहे. आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ज्येष्ठ नागरिक धोरणाला मंजुरी देण्यात आली.

 

ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य सुरळीत जावं यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यांच्यासाठी महिना 600 रुपये मदत, 24 तास हेल्पलाईन, हॉस्पिटलमध्ये आरक्षण, पोलीस दलाची मदत अशा काही महत्त्वाच्या तरतुदी त्यामध्ये आहेत.

 धोरणातल्या तरतुदी

- राज्यातल्या 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार लाभ

- ज्येष्ठांच्या सुरक्षा आणि आरोग्याला प्राधान्य

- प्रत्येक तालुक्यात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र

- सर्व विभागांकडे या धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी

- रूग्णालयात उपचार आणि दाखल करून घेताना ज्येष्ठांना प्राधान्य

- संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ज्येष्ठांना दरमहा 600 रूपये

- ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलीस खात्याची मदत घेण्याची तरतूद

- रूग्णालयं आणि जवळच्या पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या नावाची यादी राहणार

- मनोरंजन व विरंगुळा योजना

- नागरी क्षेत्रातील गृहनिर्माण संकुलात विरंगुळा व स्मृतीभ्रंश केंद्राची सुविधा अनिवार्य

- शहरांचा मित्र वृचे जगणे सुसह्य करण्यासाठी शहराचा वृद्ध मित्र म्हणून विकास करण्याची जागतिक आरोग्य संघटनेची संकल्पना स्थानिक स्वराज्यसंस्थामार्फत अमलात आणणे.

- बसमध्ये किमान 4 आसने आरक्षित

- महापालिका ,नगरपालिकांत ज्येष्ठ नागरिक कक्ष

- सिनेमागृह,नाट्यगृहे येथे किमान 10 आसने आरक्षित

- आरोग्यविषयक योजना निराधार व दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठांना विनाशुल्क

- सवलतीच्या दरात उपकरणे व जेनरिक औषधे

- विरंगुळा केंद्रात फिजिओथेरपी,नेत्र तपासणी ,योगासने, आरोग्यशिबिर यांचे आयोजन, तसंच रक्तदाब व रक्तशर्करा तपासणीची सोय.

- महाराष्ट्रात 3.50 लाख ज्येष्ठ स्मृतीभ्रंशाने त्रस्त. ही संख्या 2026 पर्यंत दुप्पट होणार त्यामुळे सुश्रुषा सेवकांना प्रशिक्षण कार्यक्रम

- इंदिरा आवास योजनेतून एकटे राहणार्‍या वृद्धांना घरकुलासाठी 68,500 रूपये अनुदान

- जिल्हा क्षेत्रात वृध्दांश्रमांसाठी जागेचे आरक्षण

- ज्येष्ठ नागरिकांबाबत समाजात जनजागृती

- ज्येष्ठ नागरिकांबाबत जागृती करण्यासाठी तीन दिवस राज्यात पाळण्यात येतील.

विशेष दिवस

- 5 जून - ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिवस

- 21 सप्टेंबर - जागतिक अल्झायमर दिवस

- 1 ऑक्टोबर - जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2013 09:00 PM IST

ताज्या बातम्या