200व्या टेस्टनंतर BCCI सचिनला थांबवणार?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2013 03:47 PM IST

Image img_225792_sachinritarment_240x180.jpg30 सप्टेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 200 व्या ऐतिहासिक टेस्ट मॅचनंतर निवृत्ती घेण्यास बीसीसीआय सांगणार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलंय.

 

सचिनची कामगिरी पूर्वीसारखी होत नाहीए, त्यामुळे त्याचा सध्याचा फॉर्म आणि नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी बीसीसीआयनं हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. भारतीय निवड समितीतला एकही सदस्य सचिनला हा निर्णय कळवण्यास धजावत नसल्यानं बीसीसीआयनं ही जबाबदारी स्विकारली आहे.

 

सचिननं याआधीच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. आता तो मायदेशात वेस्टइंडिजविरुद्ध 200वी टेस्ट मॅच खेळण्याचा विक्रम नोंदवणार आहे. या विक्रमानंतर सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त व्हावं अशी चर्चा सुरु आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सचिनने अजून निवृत्तीचा विचार केला नसून चर्चा थांबवावी असं ठणकावून सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2013 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...