डॉकयार्ड इमारत दुर्घटनेप्रकरणी 7 अधिकारी निलंबित

  • Share this:

dockyard bulding30 सप्टेंबर : मुंबईतल्या डॉकयार्ड इमारत दुर्घटनेप्रकरणी अखेर महापालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाई केलीय. या प्रकरणी महापालिकेच्या 7 अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलंय, तर 18 अधिकार्‍यांची चौकशी सुरू झालीय. नियोजन आणि संकल्पचित्र खात्यातले आठ अधिकारी आणि बाजार खात्यातले 10 अधिकारी अशा एकूण 18 कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात येतेय.

 

बाजार समितीचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चौबे यांच्या निलंबनाबाबत अधिक माहिती घेऊन कारवाई केली जाणार असल्याचं समजतंय. इमारतीची दुरस्ती, प्रस्ताव आणि इतर सर्व प्रशासकीय बाबींचा विचार करुन ही कारवाई करण्यात आलीय. अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा आणि मोहन अडताणी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय चौकशी समिती नेमण्यात आलीय.

 

दरम्यान, या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 61 झालीये. आतापर्यंत 32 जणांना ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आलंय. त्यातल्या चौघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. बचावकार्य पूर्ण झालंय. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांऐवजी 5 लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. तसंच मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना नोकरी देण्यासाठी विशेष सेलची स्थापना करण्यात येणार आहे. तर सर्व कुटुंबांना कायमचं घरंही देण्यात येणार आहे.

 

निलंबित अधिकारी

  • - एम. एन. पटेल, कार्यकारी अभियंता
  • - एम. के. रेडेकर, सहाय्यक अभियंता
  • - एस. एन. येले, सहाय्यक अभियंता
  • - एस. एन. घाडगे, सहाय्यक अभियंता
  • - राहुल जाधव, सहाय्यक अभियंता
  • - बी. सी. चव्हाण, उपअधीक्षक
  • - जमाल काझी, निरीक्षक

 

First published: September 30, 2013, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading