94 व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी 4 दिग्गज रिंगणात

94 व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी 4 दिग्गज रिंगणात

  • Share this:

natya samelan copy28 सप्टेंबर : नाट्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहे.94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार दिग्गज निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे.

 

यात मुंबई विभागातून ज्येष्ठ नाट्यकर्मी अरूण काकडे, नागपूर विभागातून मदन गडकरी, सांगली विभागातून प्राध्यापक डॉ.तारा भवाळकर आणि पुणे विभागातून श्रीमती किर्ती शिलेदार यांची नावं सुचविण्यात आली आहेत आहेत.

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे जानेवारी 2014 साली होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी घटनेच्या कलमानुसार नाट्यपरिषदेच्या विविध शाखांमधून नावं मागवण्यात आली होती. ही नावं मागवण्याची मुदत आज संपली. यामध्ये 4 ठिकाणांहून संमेलानाध्यक्ष पदासाठी नावं आलीयत. नावं मागे घेण्याची मुदत शुक्रवार 4 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे.

First published: September 28, 2013, 10:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading