S M L

बिल्डरांना सुप्रीम कोर्टाचा दणका,व्हॅट भरावाच लागणार!

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2013 06:14 PM IST

Image img_219812_punebilding34_240x180.jpg26 सप्टेंबर : घरांवर व्हॅट लागू करण्याचा निर्णय योग्य असल्याचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. त्यामुळे बिल्डरांना आता 5 टक्के व्हॅट भरावाच लागणार आहे. ऑक्टोबर 2012 मध्ये 2006 ते 2010 च्या दरम्यानचा 5 टक्के व्हॅट बिल्डरांनीच भरावा असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता.

 

पण या निर्णयाला बिल्डर संघटनांचा विरोध होता. या निर्णयाविरोधात बिल्डर लॉबिनं अगोदर हायकोर्टात धाव घेतली होती. पण तिथेही कोर्टाने राज्य सरकाराच निर्णय योग्य ठरवत याचिका फेटाळून लावली.

 

हायकोर्टाच्या निर्णयानंतरही बिल्डर लॉबीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली पण सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम राखत बिल्डर संघटनांची याचिका फेटाळून लावली आहे.या निर्णयामुळे 2006 नंतरच्या घर खरेदीवर व्हॅट लागणार आहे. व्हॅट बिल्डर भरणार की तो बोजा ग्राहकांवर लादणार हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Loading...

काय आहे या व्हॅटमध्ये

वीज बिल, मेंटेन्स,नोंदणी शुल्क आदी हे सर्व ग्राहकांनी भरायचे आणि व्हॅटही त्यांनीच भरावा असा करार करण्यात आला होता. हा करार अन्यायकारक असल्याचं सांगत ग्राहक संघटनेनं कोर्टात धाव घेतली होती. कर विक्रीकर विभागाने दोन परिपत्रक काढली त्यात 5 टक्के कर भरण्यात यावा असं नमूद केलं. पण हा कर बांधकाम खर्चात भरायचा की फ्लॅटच्या किंमतीत यावरून गोंधळ निर्माण झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2013 06:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close