उपराकार लक्ष्मण मानेंच्या तोंडाला काळं फासलं

  • Share this:

Image img_234782_laxmanmane44_240x180.jpg24 सप्टेंबर : बलात्कार प्रकरणी अडचणीत आलेले उपराकार लक्ष्मण माने यांच्या तोंडाला काळ फासण्याची घटना बीडमध्ये घडलीय. वसंतराव नाईक महामंडळाकडून कर्जाचं आश्वासन देऊनही मंजूर न केल्यामुळे रागातून हे कृत्य केल्याचं समजतंय.

 

माने हे वसंतराव नाईक महामंडळाचे माजी अध्यक्ष आहे. आसाराम गायकवाड नावाच्या कार्यकर्त्यानं मानेंच्या तोंडाला काळ फासण्याचं हे कृत्य केलंय. भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या रहिवासी निवडणुका लागल्या आहेत. यासाठी सभासद नोंदणी अभियानासाठी माने आज बीडमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना गायकवाड या व्यक्तीने येऊन माने यांच्या अंगावर काळी शाई फेकली आणि तोंडाला काळं फासलं. हा सर्व प्रकार येथील स्थानिक पत्रकारांच्या समोर घडला.

 

मात्र माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. कर्ज वाटण्याचा संबंध हा मंडळाच्या व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचार्‍यांशी येतो त्याचा माझ्याशी काहीही संबंध येत नाही. काही तरी गैरसमजातून हा प्रकार घडला अशी प्रतिक्रिया लक्ष्मण माने यांनी आयबीएन लोकमतकडे दिली.

 

तसंच या अगोदरही तीनवेळा माझ्या कारमध्ये छेडछाड करून अपघात घडवण्याचा प्रयत्न झालाय. आणि आजच्या या प्रकारामुळे माझ्या जीवाला धोका आहे असंही माने यांनी सांगितलं. तसंच ज्या माणसांना हे कृत्य केलं ती माणसं माझ्या समाजातली आहे. राग-लोभ येत असतो जात असतो त्याची चिंता करण्याची गरज नाही. लोकं आंब्याच्या झाडाला दगडं मारतात,बाभळीच्या झाडाला कुणीही दगडं मारत नाही. त्यामुळे घरातल्या माणसाने काही केले म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार नाही असं सांगत माने यांनी सदरील व्यक्तीला माफ केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2013 03:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading