बाळासाहेबांच्या बांधकामविरहीत स्मारकाला परवानगी

  • Share this:

Image balasaheb_thakare_300x255.jpg23 सप्टेंबर : शिवाजी पार्क अर्थात 'शिवतीर्था'वरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बांधकाम विरहीत बाग वजा स्मृती चौथरा उभारला जाणार आहे. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचाचौथरा होण्यामधल्या सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकाला हेरिटेज कमिटीनं मान्यता दिलीय.

 

शिवाजी पार्कात बांधकाम विरहित स्मारक उभारण्याला कमिटीनं मान्यता दिलीय. 14 ऑगस्ट 2013 च्या महापालिकेच्या परिपत्रकानुसार शिवाजी पार्क परिसर हा नव्या विकास नियमावलीनुसार हेरिटेज परिसर म्हणून घोषित करण्यात आला होता. यानुसार या परिसरात कोणतंही काँक्रेटचं बांधकाम करताय येणार नव्हते.

 

त्यामुळे शिवाजी पार्कवर मातीचा भराव टाकून स्मृती चौथरा उभारला जाणार असा प्रस्ताव मांडण्यात आला. यासाठी हेरिटेज कमिटीकडून मान्यता मिळण्याची बाकी होती अखेरीस आज कमिटीने हिरवा कंदील देत लाखो शिवसैनिकांना दिलासादायक बातमी दिली. त्यामुळे लवकरच हे स्मारक उभारलं जाणार हे स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे येत्या 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांचा पहिला स्मृती दिन आहे.  गेल्या वर्षभरापासून शिवतीर्थावरच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी लावून धरली होती. अखेरीस त्यांच्या मागणीला यश मिळालाय.

First published: September 23, 2013, 11:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading