लंडनच्या विमानतळावर बाबा रामदेव यांची 8 तास चौकशी

  • Share this:

Image img_212652_babaramdev3465345_240x180.jpg21 सप्टेंबर : योगगुरू बाबा रामदेव यांना लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलं होतं. ब्रिटनच्या कस्टम अधिकार्‍यांनी त्यांची 8 तास चौकशी आली. त्यांना का ताब्यात घेण्यात आलं याचं नेमकं कारण समजलेलं नाही.

 

पण सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी बिझनेस व्हिसाऐवजी व्हिजिटर्स व्हिसावर इंग्लंडमध्ये प्रवेश केल्यानं ही कारवाई झाल्याचं समजतंय. तसंच यावेळी रामदेव यांच्याकडे असलेल्या औषधाबद्दलही कस्टम अधिकार्‍यांनी चौकशी केली. पण बाबा रामदेव यांच्या प्रवक्तांनी औषधाबद्दल चौकशी झाली नसल्याचं म्हटलंय.

 

पण विमानतळावर बाबा रामदेव यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे औषध आणि पैसा मिळाला नाही. त्यांचे प्रवक्ते एस.के.तिजारावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार रामदेव यांच्याकडे हिंदी आणि संस्कृतीची काही पुस्तक आहे. ही पुस्तक कस्टम अधिकार्‍यांना समजू शकली नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली. उद्या रविवारी लंडन इथं होणार्‍या एका कार्यक्रमासाठी बाबा रामदेव दाखल झाले होते. दरम्यान, आज पुन्हा बाबा रामदेव यांना चौकशीसाठी हजर राहायला सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2013 03:56 PM IST

ताज्या बातम्या