S M L

राजाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, पोलिसांना धक्काबुक्की

Sachin Salve | Updated On: Sep 17, 2013 04:51 PM IST

राजाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, पोलिसांना धक्काबुक्की

lalbagacha raja17 सप्टेंबर : लालबागच्या राजा पुन्हा एकदा आपल्याच कार्यकर्त्यांमुळे वादात सापडलाय. या कार्यकर्त्यांची मुजोरी या ही वर्षी सुरु असून राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांशी असभ्य वर्तनाचा या कार्यकर्त्यांनी कळस गाठलाय. सोमवारी संध्याकाळी राजाच्या दर्शनासाठी आलेल्या पीएसआय अशोक सरमळे यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. या मुजोर कार्यकर्त्यांविरोधात काळाचौकी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. तासन्‌तास रांगेत उभं राहून भाविक राजाच्या दर्शनासाठी वाट पाहत असतात, पण दर्शन घेताना कार्यकर्ते भाविकांशी असभ्य वर्तन करत असल्याचं समोर आलंय. महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनाही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केली जाते.

 

राजाच्या चरणाजवळ उभे असले कार्यकर्ते महिला असो अथवा ज्येष्ठ नागरिक यांना अक्षरश: राजाच्या चरणाला स्पर्श होण्याअगोदरच ढकलून देतात. कार्यकर्त्यांचा अशा वागण्यामुळे महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. कार्यकर्त्यांच्या या मुजोरीच दखल घेत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दम भरला. कार्यकर्त्यांनी महिलांशी नीट वागावे, या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल जर वेळ आली तर मंडळावर गुन्हेही दाखल केले जाईल असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Loading...

 

पण तरीही या मुजोर, मस्तावलेल्या कार्यकर्त्यांची धटिंगशाही सुरूच आहे. सोमवारी संध्याकाळी पोलीस अधिकारी पीएसआय अशोक सरमळे यांनाच धक्काबुक्की केली. ही धक्काबुक्की कॅमेर्‍यात कैद झाली. आता या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. विशेष म्हणजे सेलिब्रेटींसाठी कार्यकर्ते पायघड्या घालतात तर दुसरीकडे सर्वसामान्य भक्तांना धक्काबुक्की करतात अशी तक्रार गणेशभक्त करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2013 03:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close