नरेंद्र मोदींना शिवसेनेचा पाठिंबा

  • Share this:

narendra modi meet udhav thakare13 सप्टेंबर : एककीकडे भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे तर दुसरीकडे एनडीएतील प्रमुख पक्ष शिवसेनेनं मात्र मोदींना पाठिंबा दिलाय.

 

गुरूवारी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान फोनवरुन चर्चा झाली. यावेळी शिवसेनेनं मोदींना पाठिंबा दिल्याचं कळतंय. तसंच गेल्या काही दिवसांपासून मोदींच्या नावावर चर्चा सुरू आहे. पण आज तो क्षण आलाय.

 

मोदींच्या नेतृत्त्वाखाली लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत आणि एनडीएला पूर्ण सत्ता मिळावी, त्या सत्तेचं नेतृत्त्व मोदींनी करावं अशी भूमिका शिवसेनेची कायम राहिली आहे अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2013 12:11 PM IST

ताज्या बातम्या