गणेश भक्तांवर विषारी माशांचा हल्ला, गिरगाव चौपटीवरील घटना

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2013 11:39 PM IST

गणेश भक्तांवर विषारी माशांचा हल्ला, गिरगाव चौपटीवरील घटना

eel fesh 210 सप्टेंबर : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्रात उतरलेल्या गणेशभक्तांवर विषारी माश्यांनी हल्ला केलाय. विषारी मासे चावल्यामुळे 55 भक्त रुग्णालयात दाखल झाले आहे. पाकट, वाम आणि इल माशांनी चावा घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

 

इल माशांच्या दंशात विषारी टॉक्सिन असल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मळमळ उलट्याचा त्रास झाला. माशांच्या दंशामुळे हा प्रकार लक्षात आल्यामुळे अनेक भक्तांनी समुद्रातून बाहेर पळ काढला. 55 गणेश भक्तांपैकी 30 जणांना नायर हॉस्पिटल, तर 12 जणांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

 

यातील कुणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या रुग्णावर उपचार करून डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आलंय. या प्रकरणी कोणत्या जातीचे मासे चावले यांचे नमुने घेण्याच काम सुरू आहे. दरम्यान, भक्तांनी पाण्यात जाऊ नये असं आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2013 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close