News18 Lokmat

संघ-भाजपचं एकमत,मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार -सूत्र

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2013 09:46 PM IST

संघ-भाजपचं एकमत,मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार -सूत्र

narendra modi09 सप्टेंबर : नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सुरू असलेला वाद अखेर मिटलाय. मोदींच्या नावावर संघ आणि भाजपचं एकमत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. आता पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी नरेंद्र मोदींच्या नावाच्या घोषणा करण्यास उशीर करू नये असं स्पष्ट मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांना सांगितल्याचं कळतंय. नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा 17 सप्टेंबरपर्यंत होऊ शकते अशीही माहिती सूत्रांनी दिली. मात्र या अगोदर भाजपच्या संसदीय समितीची बैठक होणार आहे या बैठकीत मोदींच्या उमेदवारीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजप आणि संघाची गुप्त बैठका पार पडल्यात. या बैठकीत मोदींच्या नावावरून बराच खल झाला. पण भाजप आणि संघ यांच्यात जी दोन दिवसीय बैठक झाली त्यात या मुद्द्यावर चर्चाच झाली नाही, असं संघानं म्हटलं आहे. अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केल्याचं सांगण्यात आलंय. दोन दिवसांपूर्वी संरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी आणि इतर नेत्यांनी लालकृष्ण अडवाणींशीही चर्चा केली आणि त्यांना आपलं मत सांगितलं.

 

संघासह परिवारातील सर्वच संघटनांच्या नेत्यांनी मोदींना पसंती दिल्याचं भाजपला संघानं सांगितल्याची माहितीही सूत्रांनी दिली. आता पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा केव्हा करायची त्याचा निर्णय भाजपनं घ्यावा असंही संघानं भाजपला सांगितलंय. पण निवडणुकीच्या आधी असा कुठलाही निर्णय घेऊ नये हे आपलं मत पुन्हा एकदा अडवाणींनी भागवतांना एकवलंय. तर मोदी समर्थकांनी मात्र पाच राज्यातल्या निवडणुका घोषित होण्याअगोदर निर्णय घ्या असा दबाव संघनेतृत्त्वावर आणलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2013 09:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...